‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितने घेतले अनोखे चॅलेंज; एकाच व्हिडिओत पाहायला मिळाले २० सुंदर लूक्स

आपल्या स्मितहास्याने, सौंदर्याने, अभिनयाने सर्वांना तिच्या प्रेमात पाडणारी बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ म्हणजेच अभिनेत्री म्हणजे माधुरी दीक्षित होय. माधुरीने चाहत्यांच्या मनात एक मानाचे स्थान निर्माण केले आहे. तिच्या चाहत्यांना भुरळ घालण्याची एकही संधी ती सोडत नाही. तिच्या लोकप्रियतेचा अंदाज इथूनच लावू शकतो की, तिचा कोणताही फोटो आणि व्हिडिओ शेअर होता क्षणीच मोठ्या संख्येने व्हायरल होत असतो. यातच सोशल मीडियावर तिचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये 20 फोटो आणि 2 व्हिडिओ चॅलेंज घेतले आहे. माधुरी दीक्षितच्या या पोस्टमध्ये 20 फोटो आणि 2 व्हिडिओ पाहायला मिळत आहेत.

माधुरी दीक्षितने ही पोस्ट तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केली आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, माधुरी 20 वेगवेगळे ग्लॅमरस ड्रेस घातलेली दिसत आहे. या सोबतच तिच्या 2 व्हिडिओची झलक पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ शेअर करून तिने लिहिले आहे की, “#20फोटो2व्हिडिओचॅलेंज.” तिने शेअर केलेली ही पोस्ट तिच्या चाहत्यांना खूप आवडत आहे.

View this post on Instagram

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene)

तिचे चाहते तिच्या या फोटोवर कमेंट करून प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. एका युजरने यावर कमेंट करून लिहिले आहे की, “एव्हरग्रीन ब्युटीफुल.” दुसऱ्या एका युजरने कमेंट करून लिहिले आहे की, “मॅडम तुम्ही जितक्या सुंदर आहात तितके इतर कोणीच नाहीये.”

माधुरीने शेअर केलेल्या व्हिडिओवर तिचे चाहते प्रेम दर्शवत आहेत. या व्हिडिओला आतापर्यंत 1 लाखांपेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. याआधी देखील तिचा आणखी एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये ती गाणकोकिळा लता मंगेशकर यांच्या ‘अजीब दास्तां है ये’ या गाण्यावर हावभाव देताना दिसत होती.

माधुरी दीक्षितने तिच्या करिअरमध्ये बॉलिवूडला एका पेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. यामध्ये ‘दिल’, ‘बेटा’, ‘दिल तो पागल है’, ‘हम आपके है कौन’, ‘साजन’, ‘खलनायक’, ‘देवदास’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. सध्या ‘डान्स दीवाने 3’ या शोला जज करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘तुम्ही त्याचा टीआरपीसाठी वापर केला आणि…’, पवनदीपच्या परफॉर्मन्सवर कात्री चालवणाऱ्या निर्मात्यांवर भडकले चाहते

-‘…सर्वकाही डोळ्यात असतं!’, म्हणत मराठमोळ्या अमृता खानविलकरचं ब्लॅक ऍंड व्हाईट फोटोशूट आलं चर्चेत

-घरामध्ये आई जया बच्चनला नाही, तर बायको ऐश्वर्याला घाबरतो अभिषेक बच्चन, बहीण श्वेताने केला खुलासा

Latest Post