‘नाय वरणभात लोन्चा कोन नाय कोन्चा’ नावाचा महेश मांजरेकरांचा आगामी मराठी सिनेमा


नुकताच सलमान खान आणि आयुष्य शर्मा अभिनित आणि महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘अंतिम’ हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांच्या पसंतीस देखील उतरला. बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीतील सर्वात हुशार, दूरदृष्टी असलेले आणि प्रवाहाच्या विरुद्ध विचार करून आपली कलाकृती प्रेक्षकांसमोर मांडणारी व्यक्ती म्हणजे महेश मांजरेकर. महेश यांनी आजपर्यंत हिंदी आणि मराठी भाषेत अनेक उत्कृष्ट सिनेमे दिग्दर्शित केले आणि काही सिनेमांमध्ये अभिनय देखील केला. ‘अंतिम’ सिनेमानंतर महेश आता त्यांचा नवीन सिनेमा प्रेक्षकांपुढे घेऊन येण्यास सज्ज झाले आहे.

महेश यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या आगामी मराठी सिनेमाचे पोस्टर शेअर केले आहे. नवीन वर्षात नवीन सिनेमा घेऊन येणाऱ्या महेश यांनी ट्विटरवर ट्विट करत सिनेमाचे पोस्टर शेअर केले आहे. त्यांच्या आगामी सिनेमाचे नाव आहे, ‘‘वरनभात लोन्चा नि कोन नाय कोन्चा’. सिनेमाचे हटके नाव आणि पोस्टरवर लिहिलेली चेतावणी सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. या पोस्टरसोबतच त्यांनी लिहिले आहे की, “चाळी झाल्या रे सपाट, टॉवरचा थाटमाट, शांघायच्या स्वप्नामधून आता डोळे जागले, कवल्या कवल्या जिंदगीला लंबे लंबे लागले, नाय वरणभात लोन्चा कोन नाय कोन्चा, २१ जानेवारी, २०२२ पासून आपल्या जवळच्या थेटरात.”

या चित्रपटाच्या पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेलीय. मात्र या सिनेमाचे पोस्टर इतर सिनेमांच्या पोस्टरपेक्षा खूप वेगळे आहे. कारण या पोस्टरवर कुठेही कलाकारांची नावे नाही याउलट त्यावर चक्क एक चेतावणी आणि सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख लिहिली आहे. या सिनेमाचे लेखन ज्येष्ठ नाटककार जयंत पवार यांनी केले असून, चित्रपटाची पटकथा व दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे. हा सिनेमा ‘वरनभात लोन्चा नि कोन नाय कोन्चा’ या कथेवर आधारित आहे.

या सिनेमात कोणते कलाकार असणार, सिनेमा हॉरर असणार, कॉमेडी असणार की पोस्टरवरील चेतावणी पाहून अडल्ट सिनेमा असणार असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडत आहे. मात्र हळूहळू सर्वच प्रश्नांची उत्तरं मिळतील हे नक्की. महेश मांजरेकरांचा सिनेमा म्हटल्यावर काहीतरी हटके पाहायला मिळणार यात शंका नाही.

हेही वाचा- 


Latest Post

error: Content is protected !!