Tuesday, March 19, 2024

जुनं ते सोनं! प्रेक्षकांची मनं जिंकण्यासाठी जुन्या हिट मालिका पुन्हा एकदा होणार सुरु, झी मराठीची नवी कल्पना

मागील अनेक वर्षांपासून झी मराठी या वाहिनीने प्रेक्षकांच्या मनावर आपले नाव कोरले आहे. मराठी मालिका म्हटल्यावर डोक्यात लगेच झी मराठी हे एकच नाव यायचे. या वाहिनीवरील प्रत्येक मालिका गाजणार हे सर्वश्रुत होते. या चॅनेलवर मालिका येणार म्हणजे नक्कीच कलाकरांना लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळणार हे देखील माहित असायचे. जगभरातील मराठी माणसांच्या मनावर राज्य करणारी वाहिनी म्हणून झी मराठीने नावलौकिक मिळवला. मात्र मधल्या काही काळापासून झी मराठी काहीशी मागे पडत असल्याचे चित्र दिसत आहे.

मात्र आता झी मराठीने पुन्हा त्यांचे गेलेले स्थान मिळवण्यासाठी आणि प्रेक्षकांचे मन पुन्हा जिंकण्यासाठी चांगलीच कंबर कसली आहे. चॅनेलने आता अतिशय हटके आणि रंजक अशा विविध मालिका घेऊन प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा वसा हाती घेतला आहे. नवीन मालिकांसोबतच आता जुन्या सुपरहिट मालिका देखील वाहिनीकडून पुन्हा सुरु केल्या जाणार आहेत. झी मराठीने अतिशय उत्तम आणि गाजलेल्या अनेक मालिका प्रेक्षकांना दिल्या आहेत. त्या मालिकांपैकी काही मालिका आता पुन्हा दाखवल्या जाणार आहे.

झी मराठीवर प्रसारित होणाऱ्या मालिकांचा आणि पर्यायाने चॅनेलचा टीआरपी मधल्या काही दिवसांपासून खूप घसरला असून, आता त्यालाच वर आणण्यासाठी वाहिनीकडून विविध युक्त्या लढवल्या जात आहे. याचाच एक भाग म्हणून या वाहिनीने त्यांच्या तुफान गाजलेल्या मालिका पुन्हा एकदा प्रक्षेपित करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणूनच झी मराठीने ‘होणार सून मी या घरची’ आणि ‘का रे दुरावा’ या दोन मालिका पुन्हा एकदा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘आपली दुपार | झी मराठी दुपार’ या टॅग लाईनने त्यांनी त्यांची संकल्पना सुरु होणार असल्याचे सांगितले आहे.

येत्या १३ फेब्रुवारीपासून सुयश टिळक आणि सुरुची आडारकर यांची ‘का रे दुरावा’ ही मालिका संध्याकाळी ४ वाजता तर तेजश्री प्रधान आणि शशांक केळकर यांची ‘होणार सून मी या घरची’ ही मालिका संध्याकाळी ५ वाजता प्रसारित केली जाणार आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती देण्यात आली आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
‘हे तर काहीच नाय’ शोमध्ये प्रेक्षकांना रमेश देव यांना अनुभवायची मिळणार शेवटची संधी, निधनापूर्वी लावली होती शोमध्ये हजेरी
चित्रपटांपासून दूर असूनही बक्कळ पैसा कमावते शमिता शेट्टी; पण मिळवू शकली नाही बहीण शिल्पासारखं यश

हे देखील वाचा