मलायका अरोराला पाहिजे होती ‘ती’ व्यक्ती, सुपर डान्सरच्या मंचावर व्यक्त केली खंत

Malaika Arora says I always wanted to have a daughter on stage of super dancer


बॉलिवूड मधील सुपरहिट अभिनेत्री, मॉडेल आणि डान्सर म्हणजे मलायका अरोरा. ती नेहमीच तिच्या स्टाईलमुळे आणि फिटनेसमुळे सर्वत्र चर्चेत असते. मलायकाने मॉडेल म्हणून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. पण नंतर तिने अनेक आयटम साँगमध्ये डान्स केला आहे. तसेच मलायकाच्या फिटनेसचे धडे देखील आज बॉलिवूडमधील समस्त अभिनेत्री घेतात. या वयातही तिचा फिटनेस बघून सगळे अवाक् होतात. पण सध्या ती एका वेगळ्याच विषयामुळे चर्चेत आहे.

खरंतर मलायका डान्स रियॅलिटी शो सुपर डान्सर: चॅप्टर 4 मध्ये पाहुणी म्हणून गेली होती. तिने मंचावर खंत व्यक्त केली होती. ती म्हणाली होती की, तिला एक मुलगी असावी. यासोबतच तिने स्पर्धक फ्लोरीना गोगोई सोबत डान्स केला होता.

स्पर्धक फ्लोरीना गोगोईच्या डान्सनंतर मलायकाने सहा वर्षाच्या मुलीला उचलून घेतले आणि म्हणाली की, मला एक मुलगी हवी होती. मलायका म्हणाली की, “मी तुला माझ्या घरी घेऊन का?? मला एक मुलगा आहे. पण खूप दिवसापासून मी म्हणत आहे की, मला एक मुलगी असती तर किती छान झालं असतं. माझ्याकडे एवढे सुंदर ड्रेस आणि चपला आहेत त्या कोण वापरणार आता?”

या शोमधील स्पर्धक फ्लॉरीनाने 1980 च्या दशकातील डिस्को स्टेशन या गाण्यावर डान्स केला. हे गाणे ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी गायले आहे. ती जेव्हा डान्स करत होती, तेव्हा मलायका मंचावर गेली आणि तिच्या सोबत जबरदस्त डान्स केला.

मलायकाने 1998 मध्ये अरबाज खानसोबत लग्न केले होते. पण 2017 मध्ये त्या दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर ती अर्जुन कपूर सोबत रिलेशनमध्ये आली. तिने ‘छैया छैया’, ‘मुन्नी बदनाम हुई’ यांसारखे आयटम साँग केले आहेत. मलायका उत्कृष्ट डान्सर सोबत एक मॉडेल देखील आहे. तिने अनेक रियॅलिटी शो जज देखील केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-नुकतीच आई झालेली अभिनेत्री अनिता हसनंदानीने व्हिडिओ शेअर करून सांगितले स्तनपानाचे महत्त्व, म्हणाली…

-डॉक्टरांना ‘सैतान’ म्हणणे सुनील पालला पडले भलतेच महागात! कॉमेडियन विरोधात एफआयआर दाखल

-‘अंदाज अपना अपना’ चित्रपटादरम्यान ‘या’ कारणामुळे आमिर खानला आवडत नव्हता सलमान खान; नंतर बनले जिगरी मित्र


Leave A Reply

Your email address will not be published.