नुकतीच आई झालेली अभिनेत्री अनिता हसनंदानीने व्हिडिओ शेअर करून सांगितले स्तनपानाचे महत्त्व, म्हणाली…

Actress Anita Hassanandani told importance of breast feeding on social media


चित्रपटसृष्टीमध्ये असे खूप कमी कलाकार आहेत जे त्यांचे वैयक्तिक आयुष्य नेहमी प्रेक्षकांसोबत शेअर करत असतात. कलाकारांचे व्यावसायिक आयुष्य तर सर्वांना माहितीच असते. पण ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काय करतात हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांना असते. आपले वैयक्तिक आयुष्य नेहमीच प्रेक्षकांसोबत शेअर करणारी अभिनेत्री म्हणजे अनिता हसनंदानी. ती नेहमीच तिच्या वक्त्यव्यामुळे चर्चित असते. नुकतेच तिने स्तनपानावरून तिचे मत व्यक्त केले आहे. अनिता काही दिवसांपूर्वी आई झाली आहे आणि तिने स्तनपान करणे किती गरजेचे आहे हे सांगितले आहे. याबाबत माहिती देताना तिने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये तिच्यासोबत तिचा मुलगा देखील दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तिने सांगितले आहे की, ती तिच्या मुलाला आरवला तोपर्यंत स्तनपान करते जोपर्यंत ती करू शकते. अनिताने सांगितले आहे की, “एक आई म्हणून सर्वात आधी माझी जबाबदारी ही आहे की, मी माझ्या बाळासाठी सगळं काही करत आहे का? जेव्हापासून मी आरवला जन्म दिला आहे, तेव्हापासून मला सगळेजण हाच सल्ला देत आहेत की, तुझ्या बाळाच्या तंदरुस्त आरोग्यासाठी स्तनपान करणे गरजेचे आहे.”

अनिताने पुढे सांगितले की, “आईच्या दुधात त्या अँटीबॉडीज असतात ज्या बाळाच्या रोगप्रतिकार शक्तीला बळकट बनवतात. त्यामुळे मी असा निर्णय घेतला आहे की, मी आरवला तोपर्यंत स्तनपान करणार जोपर्यंत मी करू शकते. जवळपास पुढचे सहा महिने तरी मी त्याला स्तनपान करणार आहे.”

अनिता आणि तिचे पती रोहित रेड्डी हे त्यांच्या मुलामुळे खूपच चर्चित आले आहेत. नुकतेच त्यांनी आरवसाठी एक पाळणा खरेदी केला होता, ज्याची किंमत 18,999 एवढी होती. अनिताने 9 फेब्रुवारीला आरवला जन्म दिला आहे. तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती तिच्या गरोदरपणातील फोटो आणि व्हिडिओ अजूनही सोशल मीडियावर शेअर करत असते. या सोबतच ती आरव सोबतचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-व्हिडिओ: मॅगी समोर असून खाऊ शकली नाही सनी लिओनी; कारण जाणून म्हणाल, ‘बरोबर केलंस सनी’

-‘लाज शरम सर्व विकली का?’, म्हणत रश्मी देसाईचा छोट्या कपड्यांमधील डान्स पाहून चाहत्यानेच केले ट्रोल

-‘मी आत्ताच पोलिसात जाते…’, कोरोनाच्या काळात औषधांचा काळाबाजार बघून भडकली अभिनेत्री संभावना सेठ


Leave A Reply

Your email address will not be published.