सतत या ना त्या कारणाने चर्चेत राहाणारी ‘मुन्नी‘ म्हणजेच अभिनेत्री मलायका अरोरा होय. मलायका ही गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर सतत चर्चेत येत आहे. मलायका अरोरा एक अशी अभिनेत्री आहे जी वयाच्या 49 व्या वर्षीही तरुण अभिनेत्रींना टक्कर देते. तिच्या सौंदर्यामुळे आणि स्टाइलमुळे ती लोकांना तिचे वेड लावते.
सध्या मलायका अरोरा (Malaika Arora) मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी ही अभिनेत्री सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर करत असते, ज्यावर लोक खूप लाईक आणि कमेंटचा वर्षाव करत असतात. तिला फक्त तिच्या फिटनेससाठीच नाही तर तिच्या फॅशन सेन्ससाठी स्टाईल आयकॉन म्हटले जाते.
अभिनेत्रीचा प्रत्येक लूक हा फॅशन ट्रेंड बनतो. तिने पारंपारिक किंवा वेस्टर्न कपडे परिधान केले तरी तिचा प्रत्येक लूक अप्रतिम असतो. तुम्हालाही मलायकाचा फॅशन सेन्स आवडत असेल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे.मलायका अरोरा नेहमीच तिच्या फिटनेस आणि स्टाईलसाठी ओळखली जाते. 49 वर्षांच्या मलायका तिच्या लेटेस्ट फोटोंमध्ये खूपच बोल्ड दिसत आहे.
View this post on Instagram
मलायका अरोराने नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती हिरव्या रंगाच्या जॅकेट आणि निळ्या रंगाच्या पॅन्टमध्ये दिसत आहे. या फोटोंमध्ये तिचा टोन्ड फिगर आणि सुंदर चेहरा स्पष्टपणे दिसून येतो. मलायका अरोरा नेहमीच तिच्या फिटनेसवर लक्ष देते. ती नियमितपणे जिममध्ये जाते आणि योगा करते. तसेच अभिनेत्री लोकांना निरोगी राहण्यासाठी टिप्सही देत असते. ज्यासाठी अभिनेत्री मलायका अनेकदा व्हिडीओद्वारे योगासनाविषयी माहिती देत असते. जर तुम्हालाही मलायकाप्रमाणे तंदुरुस्त व्हायचे असेल तर तुम्ही तिचा योगा फॉलो करू शकता. (Malaika Arora sizzles in her 40s in a white dress)
अधिक वाचा-
–‘मी जिंवत..,’ असं म्हणत BTS ग्रुपच्या ‘या’ गायकाने संगीत जगताला ठोकला रामराम, आता देशासाठी…
–‘या’ पठ्याने थेट दिली उर्फीला टक्कर; अभिनेत्रीने केला शर्टपासून ड्रेस तयार, चाहत्याने चक्क पॅन्ट….