Thursday, November 7, 2024
Home बॉलीवूड ‘मी जिंवत..,’ असं म्हणत BTS ग्रुपच्या ‘या’ गायकाने संगीत जगताला ठोकला रामराम, आता देशासाठी…

‘मी जिंवत..,’ असं म्हणत BTS ग्रुपच्या ‘या’ गायकाने संगीत जगताला ठोकला रामराम, आता देशासाठी…

आपल्या आवाजने संपूर्ण जगाला वेड लावणारा सूगा सध्या चांगलाच चर्चेत आला. त्याने त्याच्या आवाजाच्या जोरावर लोखो चाहत्यांच्या मनात घर निर्माण केले आहे. सूगाच्या चाहत्यासाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. बीटीएस बँडने आपल्या संगीताने संपूर्ण जगाला वेड लावले आहे. या प्रसिद्ध कोरियन बँडने भारतातही प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. आजकाल, प्रत्येकाच्या झुम्बावर BTS बँडची गाणी आहेत. दरम्यान, एक मोठी बातमी समोर आली आहे ज्याने चाहत्यांची निराशा केली आहे. सुगा सैन्यात भरती होणार आहे आणि त्याच्या सामील होण्याची निश्चित तारीख देखील समोर आली आहे.

सुगाने (BTS Suga) थेट सत्रादरम्यान त्याच्या चाहत्यांचा निरोप घेतला. तो म्हणाला की, ‘मी जिवंत आहे. हे सिद्ध करण्यासाठी मी तुमच्यासमोर आलो आहे. यात रडण्यासारखे काही नाही. शेवटच्या मैफिलीनंतर माझ्या शरीरात खुप वेदना होत्या. यामुळे मी बराच वेळ विश्रांती घेत होतो. यादरम्यान मी माझ्या कुटुंबासोबत काही वेळ घालवला. मी तिथेही खूप काम केलं.”

पुढे तो म्हणाला की, “मी सैन्यात भरती होणार आहे. मी माझा अभ्यासक्रम पूर्ण करून 2025 साली मी परत येईल. मला पण खूप वाईट वाटतंय की, पुढची दोन वर्षे मी तुझ्यासाठी काही करू शकणार नाही.” निरोप घेताना, सुगाने पुन्हा आपल्या चाहत्यांना वचन दिले की तो लवकरच परत येईल. सुगा 22 सप्टेंबरपासून सैन्यात आपली सेवा सुरू करणार आहे.

दक्षिण कोरियामध्ये 18 ते 28 वयोगटातील मुलांना सैन्यात भरती होणे आवश्यक आहे अशी संस्कृती आहे. तर बीटीएस (Singers) बॉयने अनेक गाणी दिली आहेत. ‘फुलपाखरू’, ‘बटर’, ‘ओह’, ‘फायर’ आणि ‘स्प्रिंग डे’ यांसारख्या गाणी गाऊन त्याने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. सूगाने काही काळापूर्वी लाईव्ह सेशल घेतले आणि यात त्याने चाहत्यांचा निरोप घेतला. (bts memberbts suga says goodbye to his fans as he joins the army video viral)

अधिक वाचा-
‘त्याने प्रसिद्धीसाठी माझा वापर केला’, राखी सावंतने आदिल दुर्रानी विरोधात शेअर केले पुरावे
“आमच्या घरी गणपती बसत नाही..”, क्रांतीने शेअर केला जुळ्या लेकींचा ‘तो’ व्हिडिओ, चाहते म्हणाले…

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा