×

‘छैंया-छैंया’ गाण्याने घराघरांत पोहोचलेल्या मलायकाला ‘या’ व्यक्तीने शिकवला होता डान्स

मलायका अरोरा बॉलिवूडमधील प्रसिद्ध डान्सर, अभिनेत्री आणि निर्माती आहे. शिवाय मलायका तिच्या फिटनेसबाबतही प्रचंड सजग असते. याच मलायकाने तिच्या डान्समुळे प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले आहे. मलायका अनेकदा पुरस्कार सोहळ्यांमध्ये, रियॅलिटी शोमध्ये आपल्याला डान्स करताना दिसते. तिला डान्स करताना पाहणे म्हणजे तिच्या चाहत्यांसाठी जणू पर्वणीच असते. मात्र, तुम्हाला माहित आहे का, की मलायकाच्या या सुंदर नृत्यामागे कोणाचा हात आहे? मलायका आज जो जबरदस्त डान्स करते तो डान्स तिला एका खास व्यक्तीने शिकवला आहे.

आज अनेक रियॅलिटी शोमध्ये परीक्षक म्हणून मलायका अरोरा आणि टेरेंस लुइस यांची जोडी आपण बघतच असतो. चांगले मित्र, चांगले सहकारी असण्याआधी या दोघांमध्ये गुरु शिष्याचे नाते आहे. हो, मलायका ही टेरेंस लुइसची शिष्या आहे.

मलायका जेव्हा या क्षेत्रात येण्यासाठी प्रयत्न करत होती आणि सुरुवातीला मॉडेलिंग करायची तेव्हा ती बॉलिवूडमधील प्रसिद्ध आणि प्रतिभावान नृत्यदिग्दर्शक असलेल्या टेरेंस लुइसकडे नृत्याचे धडे गिरवायला जायची. साधारण वीस वर्षांपूर्वी मलायकाने डान्स शिकण्यासाठी टेरेंस लुईसच्या डान्स अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला होता. मलायकाने स्वतः या गोष्टीबद्दल सर्वाना सांगितले आहे.

‘इंडिया बेस्ट डांसर’ ह्या शोच्या प्रमोशनवेळी मलायका अरोरा ‘द कपिल शर्मा’ शो मध्ये पोहचली होती. याच शोमध्ये तिने या गोष्टीचा खुलासा केला. मलायका अरोरा आणि टेरेंस लुइस या दोघांनी मिळून अनेक डान्स शोचे परीक्षण केले आहे. या शोमध्ये देखील ही जोडी परीक्षक म्हणून दिसणार असल्याने ते ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये पोहचले होते. त्यावेळी मलायकाने डान्स हा टेरेंस लुइसकडून शिकल्याचे सांगितले. यावर टेरेंस लुइसने मलायका एक उत्तम विद्यार्थिनी होती सोबतच ती वेळेत क्लासला यायची, सर्व नीट लक्षपूर्वक पाहून करायची आणि सांगितलेले सर्व ऐकायची असे म्हणत तिचे कौतुक केले.

मलायकाने १९९८ साली आलेल्या दिल से सिनेमातील ‘छैंया-छैंया’ गाण्यातून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. आज मलायका हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध आणि लोकप्रिय डान्सर आहे. तिचे वय सध्या ४७ वर्ष असून एकेवेळी तिचा गुरु राहिलेला टेरेंस लुइस आता ४६ वर्षांचा झाला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आनंदाची बातमी! ‘द कपिल शर्मा शो’ लवकरच करणार पुनरागमन; कृष्णा अन् भारतीने दिली हिंट

-‘द फॅमिली मॅन’च्या ‘सुची’नं केलंय शाहरुख खानसोबत काम; आजही सांभाळून ठेवलीय अभिनेत्याने दिलेली ‘ही’ गोष्ट

-‘शालू’च्या डान्सने पुन्हा चोरली लाखो मने; बघता बघताच पडला लाईक अन् कमेंट्सचा पाऊस

Latest Post