‘मिल गये आज मेरे सनम…’, म्हणत पती प्रदीपसोबत ‘बाईक राईड’वर निघाली मानसी नाईक


मराठमोळी मानसी नाईक सतत तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असते. नेहमी तिचे वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून ती चाहत्यांचे लक्ष वेधण्याची एकही संधी सोडत नाही. एकापेक्षा एक भन्नाट गाण्यांवर डान्स करून तिने प्रेक्षकांच्या मनात आपली छाप सोडली आहे. आता ती सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना वेड लावत असते. तिच्या मनमोहक अदा कोणालाही वेड लावायला पुरेश्या आहेत.

नुकताच तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती तिचा पती प्रदीप खरेरासोबत दिसली आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हे गोड जोडपे बाईक ट्रिपवर गेले आहेत. यात प्रदीपने काळ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत, ज्यात तो बऱ्यापैकी देखणा दिसत आहे. शिवाय मानसीनेही काळ्या रंगाचा सलवार सूट परिधान केलेला दिसत आहे. एकंदरीत या लूकमध्ये हे दोघे बाईक राईडचा आनंद लुटत आहेत.

या दोघांचा हा रोमँटिक अंदाज नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिने रोमँटिक कॅप्शनही लिहिले आहे. तिने लिहिलंय की, “वो कहाँ छुप रहे थे मैं हैरान थी, मेरी सदियों से उनसे ही पहचान थी, ऐसे क़िस्से ज़माने में होते हैं काम, आज मेरे ज़मीं पर नहीं हैं कदम. मिल गए मिल माये आज मेरे सनम, आज मेरे ज़मीं पर नहीं हैं कदम.” व्हिडिओवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया उमटत आहेत आणि लाईक्सचाही पाऊस पडत आहे. काही तासातच यावर ६ हजाराहून अधिक लाईक्स आल्याचे पाहायला मिळत आहे. (manasi naik enjoying bike ride with husband pradeep kharera see video)

मानसी नाईकच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर तिने २००७ साली आलेल्या ‘जबरदस्त’ या मराठी चित्रपटाद्वारे चित्रपट क्षेत्रात प्रवेश केला होता. ईटीव्ही मराठी या दूरचित्रवाहिनीवरून प्रसारित होणार्‍या ‘चार दिवस सासूचे’ या मालिकेतील मुख्य नायिकेची तिने साकारलेली भूमिका विशेष गाजली. तसेच, ‘वाट बघतोय रिक्षावाला’ आणि ‘बाई वाड्यावर या’ या गीतांनी तिला विशेष ओळख मिळवून दिली.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.