राज कौशल यांच्या निधनानंतर मंदिरा बेदीच्या लग्नाचे फोटो होतायेत व्हायरल; पाहून तुम्हीही व्हाल भावूक


अभिनेत्री मंदिरा बेदीचे पती राज कौशल यांचे ३० जूनला पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. फिल्म मेकर आणि प्रोड्युसर असलेल्या राज कौशल यांच्या निधनाच्या बातमीने बॉलिवूडला देखील मोठा धक्का बसला आहे. राज कौशल यांच्या या आकस्मिक निधनामुळे मंदिरी बेदी आणि तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. राज यांच्या निधनानंतर, राज आणि मंदिरा यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आज आम्ही तुम्हाला राज आणि मंदिरा यांच्या लव्हस्टोरीबद्दल आणि लग्नाबद्दल सांगणार आहोत.

मंदिरा आणि राज यांची पहिली भेट १९९६ साली झाली. त्यावेळी राज दिग्दर्शक मुकुल रॉय यांच्याकडे मुख्य सहायक म्हणून काम पाहायचे. तर मंदिरा त्यावेळी एक स्टार होती, कारण तिची ‘शांती’ मालिका आणि ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. म्हणून ती चांगलीच लोकप्रिय झाली होती. तर राज हे त्यावेळी ‘फिलिप्स १०’ साठी ऑडिशन घेत होते. राज यांनी मंदिराचे काम पाहिले. त्यावेळी मंदिरा यांनी लाल आणि पांढऱ्या रंगाचा स्ट्रिप्ड टी शर्ट आणि खाकी पॅन्ट घातली होती. या भेटीनंतर मंदिरा आणि राज सतत एकमेकांशी भेटत राहिले. एका विशिष्ट काळानंतर दोघांनाही एकेमकांबद्दल काहीतरी वेगळे जाणवू लागले. एका मुलाखतीमध्ये राजने सांगितले होते की, “आमच्या तिसऱ्याच भेटीनंतर मला समजले होते की, मला माझे प्रेम मिळाले आहे.” तर मंदिरा म्हणाली होती की, तो खूपच साधा आणि प्रामाणिक माणूस आहे. तो कुठेही दिखावा करत नाही.”

राज यांना मंदिरासोबत लग्न करायचे होते. त्यांनी मंदिराला त्यांच्या घरच्यांना देखील भेटवले. मात्र मंदिराच्या घरचे या लग्नासाठी तयार नव्हते. त्यांना एका दिग्दर्शकाशी मंदिराचे लग्न करायचे नव्हते. याबद्दल राज म्हणाले होते की, “मला मंदिराच्या घरच्यांना भेटताना खूपच वेगळे वाटत होते. तिचे वडील एक कॉर्पोरेट क्षेत्रातून होते. पण हळूहळू तिच्या घरचे देखील माझ्यात मिसळले आणि लग्नाला तयार झाले. आम्ही १४ फेब्रुवारी १९९९ मध्ये लग्न केले. मंदिरा बेदी आणि राज कौशल यांना दोन मुलं आहेत. यापैकी त्यांच्या मुलाचा जन्म २०११ साली झाला, तर २०२० साली त्यांनी ४ वर्षाच्या मुलीला दत्तक घेतले. त्या मुलीचे नाव तारा ठेवले आहे.

रविवारी २९ जून रोजी राज व मंदिरा यांनी काही मित्रांना पार्टी दिली होती. त्याचे फोटो राज यांनी इंस्टाग्रामवर शेअर केले होते. नुकत्याच झालेल्या या पार्टीमध्ये नेहा धूपिया, अंगद बेदी, जहीर खान, सागरिका घाटगे, आशीष चौधरी अशा अनेकांनी हजेरी लावली होती. बुधवार ३० जून रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने राज कौशल यांचे निधन झाले.

राज यांनी अभिनेता म्हणून करिअरची सुरुवात केली होती. यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीत ‘प्यार में कभी कभी’, ‘शादी का लड्डू’ आणि ‘अँथनी कौन है’ सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कृष्णा श्रॉफचे म्युझिक व्हिडिओमधून दमदार पदार्पण; तिच्या अदा पाहून स्वत: ला रोखू शकली नाही दिशा पटानी आणि…

-‘तु किती वेळा सिगारेट घेतेस?’ युजरच्या या प्रश्नावर ‘नॅशनल क्रश’ रश्मिकाने ‘अशी’ दिली प्रतिक्रिया

-सामान्य मुलीपासून लोकप्रिय चेहरा बनली शर्ली सेतिया; केवळ गायकीचेच नव्हे, तर तिच्या लुक्सचेही आहेत लाखो दिवाने


Leave A Reply

Your email address will not be published.