Saturday, January 28, 2023

‘सोशल मीडिया अन् मीडियानं केला सगळा खेळखंडोबा …’, विक्रम गोखलेंच्या निधनानंतर शरद पोंक्षेंची संतप्त प्रतिक्रिया

रंगभूमीपासून ते बाॅलिवूडपर्यंत आपल्या अभिनय कर्तृत्वाचा ठसा उमटवून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे वयाच्या 77व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाच्या वृत्तानंतर सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनानंतर अनेक कालाकारांसह नेत्यांनीही विक्रम गाेखले यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

अलीकडेच ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक विक्रम चंद्रकांत गोखले (vikram gokhale) यांनी ‘गोदावरी’ या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली हाेती. त्यांच्या जाण्याने संपूर्ण सिनेसृष्टीने हळहळ व्यक्त केली आहे. कित्येक कलाकारांसह राजकीय नेत्यांनीही त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. अभिनेते शरद पोंक्षे (sharad ponkshe) यांनीदेखील माध्यमांशी संवाद साधला. यादरम्यान शरद पाेंक्षें खूप भावूक झालेत. शिवाय गेले काही दिवस अभिनेता विक्रम गोखलेंच्या मृत्यूबद्दल अफवा पसरवणाऱ्या लाेकांनाही शरद पोंक्षे यांनी झापले.

अभिनेता शरद पोंक्षे म्हणाले, “विक्रम गोखले हे आमच्या पिढ्यांचे गुरु आहेत. त्यांच्याकडे बघून आम्ही सगळेजण अभिनय शिकलो. गेले चार दिवस अभिनेत्याच्या मृत्यूच्या बातमीचा समाज माध्यमाने आणि मीडियाने सगळा खेळखंडोबा केला. काहीही पुरावा हाती नसताना सगळे त्यांना श्रद्धांजली वाहून मोकळे झाले. ज्यांनी या घाणेरड्या शब्दांत श्रद्धांजली वाहिली असेल त्यांच्या जीवाला आज शांतता मिळाली असेल. त्यांच्या मृत्यूचा खेळखंडाेबा करणाऱ्यांविरुद्ध मी सर्वप्रथम तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करतो आणि मग हे दुःख व्यक्त करतो. आमचे काका गेले, आमचा गुरु गेला, आमचा पाठीराखा गेला. आमच्या पिढीला पोरकं करून गेले विक्रम गोखले. खूप आशा काल (शुक्रवारी दि. 25 नाेव्हेंबर) संध्याकाळी निर्माण झाली होती. ते परत उभे राहतील, काम करतील, परत आमच्याशी बोलतील. मात्र, ही बातमी ऐकून मी अक्षरशः हादरुन गेलो. देव काकांच्या आत्म्याला शांती दे आणि त्यांच्या कुटुंबाला सावर.”

अशा पद्धतीने काही कळण्याआधीच श्रद्धांजली वाहणाऱ्यांचा निषेध करत अभिनेता शरद पोंक्षे यांनी विक्रम गोखले यांच्याबद्दल मनोगत व्यक्त केलं.(marathi actor sharad ponkshe angry reaction after bollywood actor vikram gokhale passed away)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘आयुष्य अपूर्ण आहे मित्रा…’,अनुपम खेर यांची विक्रम गोखलेंबद्दल भावूक पोस्ट

मलायका अरोराने फ्लॉन्ट केला हकटे लूक, सोशल मीडियावर फोटो होतोय तुफान व्हायरल

हे देखील वाचा