Monday, May 13, 2024

ईशा केसकरचं बॉयफ्रेंडबद्दल मोठं वक्तव्य; म्हणाली, प्रेम वगैरे…

मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका जय मल्हार मधून ‘बानू‘ नावाने घराघरात पोहोचणारी प्रसिद्ध अभिनेत्री ईशा केसकर. पुन्हा एकदा अभिनेत्री सरला एक कोटी चित्रपटाद्वारे चाहत्यांचे मनोरंज करण्यास सज्ज झाली आहे. त्यामुळे अभिनेत्री खूपच चर्चेत आहे. ईशाचा सरला एक कोटी चित्रपट (दि, 20 जानेवारी) रोजी प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. अशातच अभिनेत्रीने एका मुलाखतीदरम्यान तिचा बॉयफ्रेंड ऋषी सक्सेनाबद्दल वक्तव्य केलं आहे जे खूपच चर्चेत आलं आहे.

अभिनेत्री ईशा केसकर( Isha Keskar) अभिनयासोबतच आपल्या वैयक्तीक आयुष्यामुळे देखिल खूपच चर्चेत असते. गेल्या काही वर्षापसून ईशा तिचा बॉयफ्रेंड ऋषी सक्सेनाला (Rishi Saxena) डेट करत आहे. ऋषी आणि ईशाने सोशल मीडियावर फोटो शेअर करत आपल्या नात्याची कबूली दिली होती. ते दोघेही सतत रोमांटिक अंदाजाातले फोटो शेअर करत असतता. अशताच ईशाने एक मुलाखतीदरण्यान बॉयफ्रेंडबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

ईशाला मुलाखतीदरम्यान रिपोर्टरने विचारले की, ईशा तु शेवचटं डेटला कधी गेली होती? “यावर ईशा म्हणाली की, खूप दिवस झाले मी डेटलाच गेले नाही. आम्ही दोघंही दोन वेगवेगळ्या शहरांमध्ये शुटिंग करत आहोत. पण आमचं काम चांगलं सुरू आहे. प्रेम वगैरे नंतर होत राहिल. तुम्हीसुद्धा हे लक्षात ठेवा.” अभिनेत्रीचं वक्तव्य सध्या अनेक चाहत्यांचे लक्ष वेधत आहे.

 

View this post on Instagram

 

ऋषी सक्सेना हा देखिल मराठी वाहिनीवरील ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून प्रसिद्धी झोतात आला होता. येत्या काळात ऋषी देखिल चित्रपटांमध्ये झळकणार आहे. त्यामुळे दोघेही सध्या आपल्या कामामध्ये व्यस्त आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
शिव ठाकरेला हरवण्याच्या प्रयत्नात बिग बॉस? माजी स्पर्धकानेच केला खुलासा; म्हणाला, ‘कलर्स वाहिनीवर काम करणारी…’
‘अर्थात तुम्ही झिंगाट पिढी’, म्हणत वादग्रस्त अभिनेत्री असलेला केतकी चितळेने पोस्ट केली स्वरचित कविता

हे देखील वाचा