जगण्याचे गुपित सांगत क्रांती रेडकरने शेअर केला मजेदार व्हिडिओ; चाहत्यांसोबतच कलाकारांच्याही उमटतायेत प्रतिक्रिया


‘कोंबडी पळाली तंगडी धरून’ हे गाणं ऐकलं की, डोळ्यासमोर पहिलं नाव येतं ते अभिनेत्री क्रांती रेडकरचं. तिने अनेक चित्रपटात काम करून प्रेक्षकांना आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. क्रांती आजकाल सिनेसृष्टीत जरी सक्रिय नसली, तरी ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. दरदिवशी ती आपले व्हिडिओ शेअर करून नेटकऱ्यांचे खूप मनोरंजन करते. तिचे मजेदार व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतात.

नुकताच क्रांतीने तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात ती अतिशय मजेदार पध्दतीने तिच्या वडिलांशी संवाद साधताना दिसत आहे. खरं तर यात दोन्ही पात्र क्रांतीच साकारताना दिसली आहे. वडील बनूनही यात तीच डायलॉग बोलत आहे. यात मुलगी आणि वडिलांचे संवाद अतिशय मजेदार आहेत.

व्हिडिओमध्ये मुलगी वडिलांना म्हणते, की “पप्पा काय करत आहात.” तर वडील म्हणतात, “मेल्यावर मी कोणाकोणाला भेटणार याची यादी बनवतोय.” पुढे त्यांचे संभाषण अधिकच मजेदार बनत जाते. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही हसल्याशिवाय राहणार नाहीत.

व्हिडिओ शेअर करत क्रांतीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “माझ्या घरात मृत्यू ही एक अत्यंत साधी गोष्ट आहे. माझे वडील खूप चांगले वाचक आहेत, अत्यंत अध्यात्मिक (मध्यम धार्मिक पण अत्यंत अध्यात्मिक) आहेत. म्हणून ते नेहमी आम्हाला सांगतात की, आपण सर्व प्रवासी ट्रेनमधून उतरण्यासाठी वाट पाहत असतो. आपल्यातील काही जणांचे स्थानक समान आहेत, तर काहींचे वेगळे आहेत. गंतव्य समान आहे आणि आपण सर्व शेवटी भेटतो. मुख्य आहे ते प्रवासाचा आनंद घेणे.”

क्रांतीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर तिने २००० मध्ये ‘सून असावी अशी’ या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. मात्र तिला खरी ओळख ‘जत्रा’ या चित्रपटातून मिळाली. यातील तिचे ‘कोंबडी पळाली तंगडी धरून’ हे गाणे प्रचंड गाजले. पुढे अभिनेत्रीने ‘फुल ३ धमाल’, ‘शहाणपण देगा देवा’, ‘फक्त लढ म्हण’, ‘नो एन्ट्री: पुढे धोका आहे’, ‘खो खो’ असा चित्रपटांमध्ये काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जेव्हा कृष्णा अभिषेकने घेतले होते अनिल कपूरचे रूप; पाहून लोटपोट झाली होती सोनम कपूर

-‘तूच माझ्या जगण्याचा आधार’, सपना चौधरीच्या सुंदर व्हिडिओवर चाहत्याची प्रेमळ कमेंट

-‘इंडियन आयडल १२’मध्ये ‘मेरे रश्के कमर’ गाणं गायल्याने सोनू कक्कर ट्रोल; युजर्स म्हणाले, ‘मूळ गाण्याची…’


Leave A Reply

Your email address will not be published.