नाकात नथ अन् कपाळावर टिकली! मिताली मयेकरचा साडीतील लूक पाहून चाहत्यांना भुरळ

marathi actress mitali mayekar shared her beautiful pictures in saree goes viral on internet


मिताली मयेकर ही मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक आहे. छोट्या पडद्यापासून ते मोठ्या पडद्यापर्यंत तिने आपल्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. अभिनेत्री सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते. सतत आपले सुंदर फोटो शेअर करून, ती नेटकऱ्यांचे लक्ष वेधत असते. नुकतेच तिने पोस्ट केलेले फोटो चाहत्यांना वेड लावत आहे.

मितालीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे. यातील तिची सुंदरता पाहून, चाहते अतिशय भुरळून गेले आहेत. यात मिताली पारंपरिक लूकमध्ये दिसली आहे. तिने निळ्या काठाची हिरवी साधी परिधान केली आहे. नाकात नथ, कपाळावर टिकली आणि डोळ्यात काजळ, एकंदरीत असा लूक करून मितालीने नेटकऱ्यांना अक्षरशः वेड लावले आहे.

फोटो शेअर करत अभिनेत्रीने लिहिले की, “ये दिल कही खोया है मेरा!” हे फोटो आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. फोटोखाली कमेंट्स करून, नेटकरी तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत. अगदी काही तासांतच या फोटोंना ३१ हजाराहून अधिक लाईक्स आले आहेत.

मितालीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर तिने इरफान खानच्या ‘बिल्लू’ या हिंदी चित्रपटातून बाल कलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. यात मिताली इरफान खानच्या मुलीच्या भूमिकेत दिसली होती. नंतर तिने ‘असंभव’, ‘अनुबंध’, ‘उंच माझा झोका’, ‘तूच माझा सांगती’ अशा मालिकेमध्ये सहकारी भूमिका साकारल्या. पुढे ‘उर्फी’मध्ये मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारत तिने मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवले. ‘फ्रेशर्स’, ‘आम्ही बेफिकर’, ‘स्माईल प्लिज’, ‘हॅशटॅग प्रेम’ या चित्रपटातील तिच्या अभिनयाने तिला बरीच प्रसिद्धी मिळवून दिली. आता अभिनेत्री ‘लाडाची मी लेक गं!’ या मालिकामध्ये झळकत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.