Monday, June 24, 2024

मृण्मयी देशपांडेचा मराठमोळा बाज, नऊवारी साडीतील फोटो पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

स्टार प्रवाह या वाहिनीवरील ‘अग्निहोत्र’ या मालिकेतून तिच्या करिअरला सुरुवात करणारी अभिनेत्री म्हणजे मृण्मयी देशपांडे. ‘कुंकू’ या लोकप्रिय मालिकेत तिला बघून प्रत्येक घरातील सासूला वाटायचे की, सून असावी तर अशी. तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने आज प्रत्येक मराठी माणसाच्या मनावर तिचा ठसा उमटला आहे. मृण्मयी सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. अशातच तिचे मराठमोळ्या पोशाखातील काही फोटो समोर आले आहेत.

मृण्मयीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, तिने सुंदर अशी लाल रंगाची पैठणी, नऊवारी साडी नेसली आहे. यावर तिने नाकात नथ, कपाळी चंद्राची कोर, केसात गजरा माळून अस्सल मराठमोळा लूक केला आहे. या फोटोमध्ये ती हातात माईक घेऊन कोणत्यातरी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना दिसत आहे. (Marathi actress mrunmayee Deshpande share her traditional photos on social)

हे फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “कारण मला सूत्रसंचालन करायला खूप आवडते.” तिचे हे फोटो अनेकांना खूप आवडले आहे. सगळेजण या फोटोवर कमेंट करून त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. अशातच अभिनेत्री उर्मिला खानविलकर हिने “गोड,” अशी कमेंट केली आहे. तसेच बाकी अनेक चाहते या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत.

मृण्मयी ही मराठी चित्रपटसृष्टीतील गाजलेली नायिका आहे. तिने तिच्या करिअरमध्ये मराठी तसेच हिंदी मालिकेत देखील काम केले आहे. मराठीतील तिचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. तिने ‘नटसम्राट’, ‘फर्जंद’, ‘मन फकिरा’, ‘कट्यार काळजात घुसली’, ‘बोगदा’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. ती सध्या ‘सारेगामापा लिटिल चॅम्प्स’ या शोचे सूत्रसंचालन करत आहे. या शो मधील तिचे सूत्रसंचालन सगळ्यांना खूप आवडत आहे. अनेकजण तिचे कौतुक करत आहेत. तसेच नुकतेच हाती आलेल्या माहितीनुसार हा शो या महिन्यात बंद होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-काय सांगता! प्राजक्ता माळी करणार २०२२ मध्ये लग्न? फोटो शेअर करून दिली गोड बातमी

-श्रुती मराठेने घेतला खऱ्या प्रेमाचा शोध, पण अडकली वेगळ्याच जाळ्यात; अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

-परीची निरागसता अन् नेहाचा समजूतदारपणा, ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील बीटीएस व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा