Friday, June 14, 2024

श्रुती मराठेने घेतला खऱ्या प्रेमाचा शोध, पण अडकली वेगळ्याच जाळ्यात; अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

टेलिव्हिजनवरील ‘राधा ही बावरी’ फेम अभिनेत्री म्हणजे श्रुती मराठे होय. श्रुतीने अनेक चित्रपटात आणि मालिकांमध्ये काम करून तिचे नाव घराघरात पोहोचवले आहे. ‘राधा ही बावरी’ या मालिकेतील तिचे सरळ साधे आणि सालस पात्र सर्वांच्याच मनात घर करून गेले. मात्र, पडद्यावर सालस दिसणारी श्रुती तिच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र खूपच ग्लॅमरस आहे. अनेकवेळा ती ग्लॅमरस तसेच पारंपारिक पोशाखातील फोटो शेअर करत असते. अशातच तिचा ग्लॅमरस लूक समोर आला आहे.

श्रुतीने अलीकडेच सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, तिने पांढऱ्या रंगाचा सुंदर असा ड्रेस घातला आहे. यावर तिने न्यूड रंगाची लिपस्टिक लावली आहे. तसेच कानात रिंगा घातल्या आहेत. या फोटोमध्ये ती वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. (Marathi actress Shruti marathe share her beautiful photo on social media)

हे फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “मी प्रेमाचा शोध घेतला आणि स्वतः मध्येच अडकले.” तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहे. अनेकजण या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. तिच्या एका चाहत्याने कमेंट केली आहे की, “अगदी सशासारखी दिसत आहे.” तसेच बाकी अनेकजण या फोटोवर त्याच्या प्रतिक्रिया देत आहेत. या फोटोला आतापर्यंत ४१ हजारांपेक्षाही जास्त लाईक्स मिळाले आहेत.

श्रुती मराठेच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने अनेक चित्रपटात काम केले आहे. तिने ‘तप्तपदी’, ‘प्रेमसूत्र’, ‘बंध नायलॉनचे’, ‘अरावण’, ‘शुभमंगल सावधान’, ‘इंदिरा विझा’ ‘सनई चौघडे’, ‘असा मी तसा मी’, ‘रमा माधव’, ‘तुझी माझी लव्ह स्टोरी’, ‘मुंबई पुणे मुंबई २’, ‘स्लॅमबुक’, ‘जागो मोहन प्यारे’ या चित्रपटात आणि मलिकांमध्ये काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-परीची निरागसता अन् नेहाचा समजूतदारपणा, ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील बीटीएस व्हिडिओ व्हायरल

-निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अगदी प्रिन्सेस दिसतेय संस्कृती बालगुडे, ग्लॅमरस अदावर तुम्हीही व्हाल फिदा

-गायिका शाल्मली खोलगडेने बॉयफ्रेंड फरहान शेखसोबत बांधली लगीनगाठ, मोजक्या लोकांच्या उपस्थित केले लग्न

हे देखील वाचा