Friday, April 19, 2024

‘किती सांगू मी सांगू कुणाला…’, म्हणणाऱ्या प्राजक्ता माळीला का झालाय एवढा आनंद

नुकतेच चित्रपटसृष्टीसाठी आणि चित्रपट प्रेमींसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. शनिवारी (२५ सप्टेंबर) महाराष्ट्र शासनाने चित्रपटगृह आणि नाट्यगृह खुली करण्याची परवानगी दिली आहे. यामुळे कलाकार, निर्माते, दिग्दर्शक, चित्रपटसृष्टीशी निगडित सगळे लोक, थिएटर मालक आणि प्रेक्षकांच्या आनंदाला उधाण आले आहे. कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे सगळी चित्रपटगृह आणि नाट्यगृह बंद होती. परंतु आता शासनाने परवानगी दिल्यामुळे सगळ्यांनाच खूप आनंद झाला आहे. हाच आनंद अनेक कलाकार सोशल मीडियावर शेअर करत आहेत. अशातच मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने सोशल मीडियावर एक पोस्ट करून तिचा आनंद व्यक्त केला आहे.

प्राजक्ताने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचा एक फोटो शेअर करून एक सुंदर कॅप्शन दिले आहे. प्राजक्ताने शेअर केलेल्या या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने पांढऱ्या रंगाचा टॉप घातला असून, या फोटोमध्ये ती दिलखुलास हसताना दिसत आहे. ती नेहमी प्रमाणेच फार सुंदर दिसत असल्याने तिला बघणारे सर्वच घायाळ होत आहे.(Marathi actress Prajakta mali share reason of happines in her life )

हा फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला. अहो का म्हणून का विचारताय? २२ ऑक्टोबरनंतर थिएटर उघडणार म्हणतंय सरकार. कलाकार म्हणून तर सोडाच, फक्त प्रेक्षक म्हणूनही खूप खूप खूप आनंद होतोय.” तिने शेअर केलेला हा फोटो आणि कॅप्शन तिच्या चाहत्यांना खूप आवडले आहे. अनेकजण या फोटोवर प्रतिक्रिया देत आहेत.

प्राजक्ता माळीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने झी मराठीवरील ‘जुळून येती रेशीमगाठी’ या लोकप्रिय मालिकेमध्ये काम केले आहे. या मालिकेमधून तिला खूप प्रसिद्धी मिळाली. या मालिकेतील तिच्या साध्याभोळ्या आणि सालस स्वभावाने सगळ्यांच्या मनावर राज्य केले. तसेच तिने ‘खो-खो’ या चित्रपटात काम केले आहे. ती सध्या ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या विनोदी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच तिचे ‘प्राजक्तप्रभा’ हे पुस्तक प्रदर्शित झाले आहे.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जन्मापासून आतापर्यंतचे निवडक फोटो शेअर करत स्वप्नील जोशीने लेकीला दिल्या जागतिक कन्यादिनाच्या शुभेच्छा

‘अपने पास बहुत पैसा है,’ म्हणत नेहाने अनोख्या अंदाजात दिल्या परीला कन्यादिनाच्या शुभेच्छा

-अखेर प्रतीक्षा संपली, ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार रणवीर सिंग अन् दीपिका पदुकोणचा ‘८३’ चित्रपट

हे देखील वाचा