सोज्वळ शालू जेव्हा बनते हॉट! राजेश्वरी खरातच्या बोल्ड फोटोंनी वाढवले सोशल मीडियाचे तापमान


मराठी अभिनेत्री राजेश्वरी खरात ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती सातत्याने तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील घटनांची माहिती सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांना देत असते. सोशल मीडियावर तिचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. तिच्या प्रत्येक पोस्टला ते भरभरून प्रतिसाद देत असतात. राजेश्वरी आजकाल चित्रपटात जास्त दिसत नाही. परंतु सोशल मीडियावर ती मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. अशातच तिच्या बोल्ड लूकमधील काही फोटो समोर आले आहेत.

राजेश्वरीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने हिरव्या रंगाचा ब्लाऊज घातला आहे. तसेच यावर जिन्स घातली आहे. फोटोमध्ये ती खूपच बोल्ड दिसत आहे. या फोटोमध्ये ती खुर्चीवर बसून बोल्ड पोझ देताना दिसत आहे. तिचा हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. (Marathi actress Rajeshwari kharat share her bold photos on social media)

राजेश्वरीने शेअर केलेल्या या फोटोवर तिच्या अनेक चाहत्यांच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. तिचे चाहते सातत्याने कमेंट करून तिच्या या लूकचे कौतुक करत आहेत. अनेकांना तिचा हा लूक खूप आवडला आहे.

राजेश्वरीने नागराज मंजुळे यांच्या ‘फँड्री’ चित्रपटातून २०१३ साली चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटातील तिचे शालू हे पात्र खूप गाजले होते. या चित्रपटात ती अत्यंत साध्या पेहरावात दिसली होती. त्यानंतर तिने २०१७ साली ‘आयटमगिरी’ या चित्रपटात काम केले. नुकतेच तिच्या ‘रेडलाईट’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. तसं पाहायला गेलं, तर राजेश्वरीने जास्त चित्रपटात काम केले नाही. मात्र, कमी कालावधीत तिने चांगले नाव कमावले आहे. सोशल मीडियावर तिचा लाखोंमध्ये चाहतावर्ग आहे. त्यामुळे तिची कोणतीही पोस्ट व्हायरल व्हायला जास्त वेळ लागत नाही.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘ब्लॅक ब्युटी!’ पूजा सावंतच्या काळ्या ड्रेसमधील फोटोंनी चुकवला नेटकऱ्यांच्या काळजाचा ठोका

-तेजश्री प्रधानच्या सौंदर्याने घातली चाहत्यांना भुरळ, खण पैठणीतील फोटो होतोय व्हायरल

-सोशल मीडियावर पुन्हा एकदा सई लोकुरचा जलवा, पाहायला मिळाला अभिनेत्रीचा दिलखेचक अंदाज


Leave A Reply

Your email address will not be published.