Thursday, April 25, 2024

‘अशी अदा की, चाहतेही झाले फिदा’, संस्कृती बालगुडेचे ग्लॅमरस फोटो लावतायेत सर्वांना वेड

मराठी इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये संस्कृती बालगुडे हिचा समावेश होतो. टेलिव्हिजनवरून आपल्या करिअरला सुरुवात केलेली संस्कृती आज मराठी चित्रपटसृष्टीतील एक डिमांडेड अभिनेत्री झाली आहे. अनेक चित्रपटात काम करून तिने तिचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. कोणतीही भूमिका असो तिने तिच्या प्रत्येक भूमिकेला न्याय दिला आहे. अगदी साध्या भूमिकेपासून ते अगदी मॉर्डन आणि बोल्ड भूमिका तिने निभावल्या आहेत. सोशल मीडियावर देखील तिचा चांगलाच वावर वाढला आहे. अशातच तिने काही फोटो शेअर केले आहेत.

संस्कृतीने अलीकडेच सोशल मीडियावर तिचे काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने हिरव्या रंगाचा एक लाँग ड्रेस घातला आहे. तिने कानात ईअरिंग आणि केसांचा हाय बन घातला आहे. या फोटोमध्ये तिचा लूक खूपच आकर्षक आहे. ती फोटोमध्ये वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. (Marathi actress sanskruti balgude share her glamorous photos on social media)

संस्कृतीने शेअर केलेला हा फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. अनेकजण तिच्या या फोटोवर प्रतिक्रिया देत आहेत. तिच्या एका चाहत्याने या फोटोवर “एकदम कडक,” अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले आहे की, “मराठी सिनेमा सृष्टीतील कमी कालावधीत प्रचंड नाव लौकिक मिळवलेली अभिनेत्री,” तसेच इतर अनेक चाहते या फोटोवर हार्ट ईमोजी पोस्ट करत आहेत.

संस्कृती ही मराठी चित्रपटसृष्टीमधील एक आघाडीची अभिनेत्री आहे. तिने तिच्या करिअरची सुरुवात ‘पिंजरा’ या मराठी मालिकेपासून केली आहे. त्यानंतर तिला अनेक चित्रपटात काम मिळाले. तिने ‘रे राया’, ‘लग्न मुबारक’, ‘शॉर्टकट दिसतो पण नसतो’, ‘शिव्या’, ‘निवडुंग’, ‘भय’, ‘सांगतो ऐका’ या चित्रपटात काम केले आहे. या आधी ती शेवटची ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ या चित्रपटात दिसली होती.

लवकरच ती ‘८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी’ या आगामी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात संस्कृतीसोबत अभिनेता शुभंकर तावडे, शर्वाणी पिल्लई, संजय मोने, आनंद इंगळे, राधिका हर्षे, अश्विनी कुलकर्णी, विजय पटवर्धन, चिन्मय संत, डॉ. निखिल राजेशिर्के हे कलाकार दिसणार आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जेव्हा महेश भट्ट यांना समजवण्यासाठी नग्नावस्थेत रस्त्यावर धावल्या होत्या परवीन बाबी, मग पुढे…

-Netflix TUDUM: माधुरी दीक्षितचा डिजिटल डेब्यू, तर ‘अरण्यक’च्या धमाक्यासह ‘या’ प्रोजेक्ट्सची झाली घोषणा

-सिनेमागृह सुरू करण्यास शासनाचा हिरवा कंदील, तरीही ‘लाल सिंग चड्ढा’ प्रदर्शनाची तारीख लांबणीवरच

हे देखील वाचा