Tuesday, May 5, 2026
Home मराठी अभिनेत्री सायली संजीवच्या वडिलांचे निधन, सिनेसृष्टीतील कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली

अभिनेत्री सायली संजीवच्या वडिलांचे निधन, सिनेसृष्टीतील कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री सायली संजीव ही नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. सोशल मीडियावर तिची तगडी फॅन फॉलोविंग आहे. तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टींची माहिती ती तिच्या चाहत्यांना देत असते. अशातच तिने एक दुःखद बातमी तिच्या चाहत्यांना दिली आहे. ती बातमी म्हणजे सायलीच्या वडिलांचे निधन झाले आहे.

सायलीने अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून तिच्या वडिलांसोबत काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करून तिने अत्यंत भावुक कॅप्शन दिले आहे. तिने लिहिले आहे की, “संजीव २६/७/१९५८ ते ३०/११/२०२१. तुला माहित आहे ना बाबा. माझं तुझ्यावर सगळ्यात जास्त प्रेम होत, आहे आणि कायम असेल. या जगात सगळ्यात जास्त तू आयुष्य आहेस माझं. दैव होता तू, देव होता तू, खेळण्यातला माझा खेळ होता तू. शहाणी होते मी, वेडा होता तू. माझ्यासाठी का रे सारा खर्च केला तू. आज तू फेडू दे पांग हे मला, जगण्या रे मला अजूनही तूच हवा. बाबा, थांब ना रे तू, बाबा जाऊ नको दूर.” (Marathi actress sayali sanjeev’s father passed away, give information on social media)

तिची ही पोस्ट वाचून तिच्या चाहत्यांना खूपच दुःख झाले आहे. तसेच अनेक कलाकार देखील या पोस्टवर दुःख व्यक्त करत आहेत. तिच्या या पोस्टवर समिधा गुरू, रेशमा शिंदे, गौतमी देशपांडे, भाग्यश्री लिमये, सलील कुलकर्णी, ऋतुजा बागवे यांसारख्या अनेक कलाकारांनी तिच्या वडिलांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

सायली ही मराठी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. छोट्या पडद्यावरील ‘काहे दिया परदेश’ या मालिकेतून तिने तिच्या अभिनयाच्या करिअरला सुरुवात केली. नुकतेच तिचा ‘झिम्मा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने दोन आठवड्यातच कोटींची कमाई केली आहे. तसेच काही दिवसांपूर्वी सायलीने तिच्या कष्टाने तिच्या आयुष्यातील पहिली चार चाकी घेतली आहे. लेकीच्या यशाच्या या प्रवासात मात्र तिच्या वडिलांनी साथ सोडली.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मिलिंद गुणाजी यांच्या मुलाचा साखरपुडा थाटात पडला पार, सूनबाई आहेत ‘या’ क्षेत्राशी निगडित

-ऐकलंत का! गायिका योगिता बोराटेंचा ‘प्रेमरंग’ कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

-‘बाबा जाऊ नको दूर…’, वडिलांच्या निधनाची माहिती देत, सायली संजीवने शेअर केली भावनिक नोट

हे देखील वाचा