‘हसती रहे तू हसती रहे!’ सायली संजीवचा लाल रंगाच्या साडीमधील व्हिडिओ झाला व्हायरल

मराठी टेलिव्हिजनवरील अनेक मालिका सुपरहिट होत असतात. यातीलच एका मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते, ती मालिका म्हणजे ‘काहे दिया परदेस’ होय. या मालिकेतील शिव आणि गौरी ही पात्र तर चांगलीचं गाजली होती. ही पात्रं अभिनेत्री सायली संजीव आणि अभिनेता ऋषी सक्सेना यांनी साकारली होती. तसेच या मालिकेतील शीर्षक गीत, डायलॉग देखील प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणात आवडले होते. या मालिकेनंतर सायली संजीव प्रसिद्धीच्या झोतात आली होती. तिने अनेक चित्रपटात काम केले. सायली सध्या सोशल मीडियावर जोरदार सक्रिय असते. अशातच तिचा एक मनमोहक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सायलीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सायली चालत येताना दिसत आहे. तिने लाल रंगाची अत्यंत सुंदर आणि ग्लॅमरस प्लेन साडी नेसलेली आहे. गळ्यात एक सुंदर नेकलेस घातलेला दिसत आहे. या लूकमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.

https://www.instagram.com/reel/CTNKm9wi0YH/?utm_medium=copy_link

सायलीने शेअर केलेल्या या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. तिचे चाहते या व्हिडिओवर कमेंट करत आहेत. तिच्या या व्हिडिओवर अभिनेत्री रेश्मा शिंदे हिने “ब्युटीफुल” अशी कमेंट केली आहे. तसेच तिच्या एका चाहत्याने कमेंट केली आहे की, “दुसरं एक हृदय असतं तर तुला दिलं असतं” तर दुसऱ्या एका चाहत्याने “लालपरी” अशी कमेंट केली आहे. अशाप्रकारे तिचे चाहते कमेंट करून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहे. (marathi actress sayali sanjeev’s video viral on social media)

सायलीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘काहे दिया परदेश’ या मालिकेनंतर चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले. तिने ‘पोलीस लाईन’, ‘आटपाडी नाईट्स’, ‘मन फकीरा’, ‘सातारचा सलमान’, ‘एबी आणि सीडी’, ‘झिम्मा’, ‘गोष्ट एका पैठणीची’ अशा मराठी चित्रपटामध्ये अभिनय करून रसिकांची मने जिंकली आहेत. सध्या ती कलर्स मराठीवरील ‘शुभमंगल ऑनलाईन’ या मालिकेत काम करत आहे. या मालिकेत तिच्यासोबत अभिनेता सुयश टिळक मुख्य भूमिकेत आहे. ही मालिका देखील प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणात आवडली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बॉलिवूडच्या ‘अशा’ जोड्या जे एकमेकांपासून राहतात वेगवेगळे, पण अजूनही घेतला नाही घटस्फोट

-हद्द झाली! अमायरा दस्तूरने घातली ‘अशी’ बिकिनी; नेटकरी म्हणाले, ‘यांना नग्न व्हायला…’

-राखी सावंतने केली नाकाची शस्त्रक्रिया; व्हिडिओ शेअर करत सांगितले शस्त्रक्रियेचे कारण

Latest Post