Friday, April 24, 2026
Home मराठी ‘कुणाल रावांचं नाव घेते…’ सोनाली कुलकर्णीने तिच्या ‘अहो’साठी घेतला भन्नाट उखाणा

‘कुणाल रावांचं नाव घेते…’ सोनाली कुलकर्णीने तिच्या ‘अहो’साठी घेतला भन्नाट उखाणा

यावर्षी अनेक कलाकार विवाहबंधनात अडकले आहेत. यातीलच एक अभिनेत्री म्हणजे सगळ्यांची लाडकी अप्सरा सोनाली कुलकर्णी होय. सोनालीने यावर्षी तिचा बॉयफ्रेंड कुणाल बेनोडकरसोबत लग्न केले आहे. त्या दोघांनी अत्यंत साध्या पद्धतीने त्यांचा लग्नसोहळा पार पाडला आहे. केवळ दोन साक्षीदारांच्या उपस्थितीत दुबईमध्ये त्यांनी लग्न केले आहे. लग्न झाल्यापासून हे जोडपे खूप चर्चेत आहे. सोनाली सोशल मीडियावर तिच्या पतीसोबत अनेक फोटो तसेच व्हिडिओ शेअर करत असते. चाहते देखील त्यांच्या व्हिडिओला आणि फोटोला जोरदार प्रतिसाद देत असतात.

नुकतेच सोनाली नवराष्ट्र नावाच्या वर्तमानपत्राच्या सोहळ्याला गेली होती. या सोहळ्यात तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार मंचावर ती स्वीकारायला गेली, तेव्हा प्रसिद्ध निवेदिका मेघना एरंडे हिने सोनालीला मंचावर उखाणा घेण्याचा आग्रह केला. तेव्हा तिने अत्यंत झकास भन्नाट घेतला. हा व्हिडिओ सोनालीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

सोनालीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सोनालीने काळ्या रंगाची साडी परिधान केली आहे. या साडीवर पांढऱ्या रंगाचे डॉट आहेत. यासोबत तिने काळ्या रंगाचा प्लेन ब्लाउज घातला आहे. त्यामुळे तिच्या या साडीला खूप छान लूक आला आहे. या व्हिडिओमध्ये सोनाली मंचावर दिसत आहे. यावेळी मेघनाने सोनालीला उखाणा घेण्यासाठी आग्रह केला तेव्हा सोनालीने देखील अत्यंत मजेशीर अंदाजात प्रसंगाला अनुसरण उखाणा घेते. ती म्हणते की, “त्याचा जन्म लंडनचा राहतो दुबईत, मला बाई आवडतो महाराष्ट्र, कुणाल रावांचं नाव घेते वाचता वाचता नवराष्ट्र.” तिने हा उखाणा घेतल्यानंतर सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात तिचे कौतुक केले. तिने शेअर केलेल्या या व्हिडिओवर अनेकजण कमेंट करत आहेत. सगळ्यांना तिचा हा उखाणा खूप आवडला आहे. त्यामुळे सगळेजण तिचे तोंड भरून कौतुक करत आहेत. (marathi actress sonalee kulkarni take ukhana in award show, video viral on social media)

काही दिवसांपूर्वी सोनाली आणि कुणाल मालदीवला गेले होते. तेव्हा देखील तिने अनके फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. तिच्या चाहत्यांनी या फोटोवर जोरदार प्रतिसाद दिला होता.

सोनाली मराठी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीची नायिका आहे. ती अभिनयासोबत उत्कृष्ट डान्स देखील करते. तिने अनेक मराठी चित्रपटात काम केले आहे. तसेच तिने ‘महाराष्ट्राची डान्सिंग क्वीन’ हा रियॅलिटी डान्स शो जज देखील केला आहे. तिने ‘मितवा’, ‘नटरंग’, ‘हिरकणी, ‘पोस्टर गर्ल्स’, ‘क्लासमेट’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अभिनयात येण्यापूर्वी ‘हे’ काम करायची श्रुती हासन; म्हणाली, ‘कोणालाही माहित नव्हते की…’

-Bigg Boss OTT: लाजून लाल झाली शमिता, जेव्हा करणने ‘हॉटनेस’वर प्रश्न विचारताच राकेश म्हणाला…

-‘टायगर ३’साठी कॅटरिना कैफ रशियाला रवाना; स्टंट सीन शूट करण्यासाठी घेतीये प्रचंड मेहनत

हे देखील वाचा