वैदेही परशुरामी झाली ‘लसवंत!’ फोटोमधील हटके टी-शर्टने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष


कोरोना विषाणूची प्रकरणे सध्या कमी झाली आहेत. वादळासारख्या आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा वेग आता मंदावलेला दिसत आहे. असे असले तरी, येणारी तिसरी लाट लक्षात घेता, सर्व काळजी घेतली जात आहे. अलीकडेच सिनेसृष्टीतील अनेक सेलेब्स कोरोनाच्या विळख्यात सापडलेले पाहायला मिळाले. हा साथीचा रोग टाळण्यासाठी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लसीकरण होत आहे. आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींना ही लसी दिली गेली आहे. नुकतेच मराठमोळी अभिनेत्री वैदेही परशुरामीने या लसीचा पहिला डोस घेतला आहे.

अभिनेत्री वैदेही परशुरामीने कोरोना लस टोचल्यानंतरचा तिचा एक फोटो शेअर केला आहे. तिने मिरर सेल्फी क्लिक केला आहे, ज्यातील तिने घातलेल्या टी- शर्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे. तुम्ही पाहू शकता की, या हटके टी-शर्टमध्ये वैदेही खूप सुंदर दिसत आहे. विशेष म्हणजे या टी-शर्ट मुळेच सोशल मीडियावर चर्चा रंगलेल्या पाहायला मिळत आहे.

हा फोटो शेअर करत तिने ‘लसवंत’ असं निराळं कॅप्शन दिलं आहे. हा फोटो सोशल मीडियावर आता चांगलाच व्हायरल होत आहे. चाहते यावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत. अनेकांना तिने घातलेला टी- शर्ट खूप आवडला आहे. तसेच फोटोवर आतापर्यंत ४३ हजाराहून अधिक लाईक्स आले आहेत.

वैदेहीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर तिने ‘वेड लावी जीवा’ या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर पदार्पण केले होते. अमिताभ बच्चन अभिनित ‘वझीर’ या हिंदी चित्रपटातही तिने काम केले आहे. याशिवाय ‘सिम्बा’मध्ये तिने रणवीर सिंगच्या बहिणीची भूमिका साकारली होती. आता अभिनेत्री ‘झोंबिवली’ या मराठी चित्रपटातही झळकणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आदिल खानसोबत जोरदार ठुमके लावताना दिसली शिल्पा शेट्टी; ‘चुरा के दिल मेरा’ गाण्यावरचा धमाल परफोर्मेंस होतोय व्हायरल

-खरी-खुऱ्या आयुष्यातली ‘बार्बीडॉल’ आहे कॅटरिना कैफ; वाचा तिच्याबद्दल कधीही न ऐकलेल्या गोष्टी

-निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये ‘डिज्नी प्रिंसेस’ दिसतेय रुबीना दिलैक; पाहा अभिनेत्रीच्या मनमोहक अदा


Leave A Reply

Your email address will not be published.