अखेर प्रतिक्षा संपली!! ‘मराठी बिग बॉस ३’ चा प्रोमो प्रदर्शित; प्रेक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण


टेलिव्हिजनवरील सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा शो म्हणजे ‘बिग बॉस.’ या शोला प्रेक्षकांचे अमाप प्रेम मिळत असते. हिंदीमध्ये या शोचे १४ सिझन पूर्ण झाले आहेत. या शोच्या लोकप्रियतेनंतर हा शो मराठीत देखील आला आहे. मराठीमध्ये बिग बॉसचे २ सिझन पूर्ण झाले आहेत. परंतु कोरोना महामारीमुळे गेले दोन वर्ष बिग बॉसचा तिसरा सिझन आला नाही. खरंतर मराठी बिग बॉस प्रेमी या तिसऱ्या सिझनची आतुरतेने वाट बघत आहेत. आता याच प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे बिग बॉसचा तिसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ( Marathi bigg Boss 3 promo release, fans are crazy to see season)

‘मराठी बिग बॉस ३’ चा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. कलर्स मराठीच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा प्रोमो शेअर केला आहे. तुम्ही पाहू शकता की, बिग बॉसचा प्रोमो दाखवला आहे सोबतच लिहिले आहे की, “दार परत उघडणार आणि एकच आवाज घुमणार, कारण येतोय… #bigg Boss Marathi 3 लवकरच #colours Marathi वर.”

हा व्हिडिओ पाहून आता बिग बॉस प्रेमी खूपच खुश झाले आहेत. मागील दोन सिझनला प्रेक्षकांनी जोरदार प्रतिसाद दिला आहे. मागील दोन्हीही सिझन मराठी दिग्दर्शक, अभिनेते महेश मांजरेकर यांनी होस्ट केले आहेत. आता देखील तेच हा सिझन होस्ट करणार आहेत अशी माहिती आली आहेत. मागील २ वर्ष पुढचा सिझन न आल्याने प्रेक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण पाहायला मिळाले होते, पण आता त्यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण दिसत आहे.

बिग बॉसच्या दोन सिझनमध्ये मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकार सामील झाले होते. यामध्ये उषा नाडकर्णी, किशोरी शहाणे, रुपाली भोसले, मेघा धाडे, विना जगताप, पुष्कर जोग, शिवानी सुर्वे, सुरेखा पुणेकर, शिव ठाकरे यांसारख्या अनेक कलाकाराचा समावेश होता. बिग बॉसच्या पहिल्या सिझनची विजेती मेघा धडे ही होती. तर दुसऱ्या सिझनचा विजेता शिव ठाकरे हा होता.

‘बिग बॉस मराठी ३’ कधी सुरू होणार आहे??, शोचे टायटल साँग कसे असेल?? तसेच या सिझनमध्ये कोण कोणते कलाकार येणार आहेत?? या बाबत प्रेक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.