मोठी बातमी! ‘मराठी बिग बॉस’ फेम अभिनेत्री हीना पांचाळसह इतर २२ जणांना न्यायालयीन कोठडी


‘मराठी बिग बॉस’ची माजी स्पर्धक आणि अभिनेत्री हीना पांचाळबाबत मोठी बातमी समोर येत आहे. मागील काही दिवसांपूर्वी नाशिकमधील इगतपुरीमध्ये सुरू असलेल्या रेव्ह पार्टीमध्ये पोलिसांनी धाड टाकल्यानंतर अभिनेत्रीसह इतर 22 लोकांना अटक पोलिसांनी अटक केली होती. हाती आलेल्या वृत्तानुसार, बुधवारी (७ जुलै) जिल्हा व सत्र न्यायालयाकडून अभिनेत्रीसह या पार्टीमध्ये उपस्थित व्यक्तींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांची रवानगी नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात केली आहे.

नाशिकमधील इगतपुरीमधील स्काय ताज व्हिला या बंगल्यावर ही पार्टी चालू होती. त्यावेळी हीना सोबत काही परदेशी महिला, मराठी आणि दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील काही अभिनेत्री आणि दोन महिला कोरिओग्राफर देखील सामील होत्या. पोलिसांनी त्यांना देखील अटक केले होते.

हीना आणि इतर सगळे त्यांचा मित्र पियूष शाह याच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेले होते. ते शुक्रवारी इगातपुरीमधील स्काय ताज व्हीलामध्ये गेले होते. शनिवारी (26 जून) ला पियूषचा वाढदिवस होता. त्यामुळे त्यांनी शुक्रवारी रात्री 12 वाजता केक कापला.

शनिवारी रात्री त्यांची रेव्ह पार्टी सुरू झाली. या पार्टीमध्ये हुक्का आणि ड्रग्सचे सेवन सुरू होते. नशेत सगळेच बेधुंद झाले होते. त्यावेळी गुप्त सूत्रांकडून पोलिसांना या पार्टीबद्दल माहिती मिळाली आणि त्यांनी या बंगल्यावर छाप टाकली. त्यावेळी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या नेतृत्वात पोलिसांची टीम बंगल्यावर गेली होती.

पोलिसांच्या या छापेमारीत 10 पुरुष आणि 12 महिला अशा एकूण 22 लोकांना अटक करण्यात आले आहे. यात हीना पांचाळचा देखील समावेश आहे. तर काहीजण पोलिसांची नजर चुकवून पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. पोलिसांनी स्काय व्हीला येथील स्टाफला देखील ताब्यात घेतले आहे.

रेव्ह पार्टीत पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांची नावे
पियुष शेट्टीया, आरव शर्मा, विशाल मेहता, रोहित अरोरा, अकीब खान, वरुण बाफणा, करिश्मा, चांदणी भटिजा, श्रुती शेट्टी, रुचिरा नार्वेकर, विदेशी महिला अझार फारनुद, शनैया कौर, हिना पांचाल, अषिता, शिना, प्रिती चौधरी, कौशिकी

हीना पांचाळ हिने हिंदी तसेच मराठी चित्रपटात देखील काम केले आहे. तिने अनेक आयटम साँग देखील केले आहेत. ती मराठी ‘बिग बॉस 2’ मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री म्हणून आली होती. या शोनंतर तिला खुप लोकप्रियता मिळाली. ‘मुझसे शादी करोगी’ या रियॅलिटी शोमध्ये देखील ती सामील झाली होती.

हीना सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे वर्कआऊट करताना व्हिडिओ ती अनेकवेळा शेअर करत असते. बिग बॉसनंतर तिच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-नसीरुद्दीन शाह यांना ८ दिवसांनी मिळाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, मुलाने फोटो शेअर करत दिली माहिती

-कियारासाठी वयस्कर व्यक्तीने गाडीचा दरवाजा उघडत ठोकला सलाम; नेटकरी म्हणाले, ‘तुझ्या वडिलांपेक्षा जास्त…’

-अजय देवगणच्या ओटीटी पदार्पणासोबतच कमबॅक करणार ‘ही’ अभिनेत्री; कित्येक वर्षांपासून आहे मोठ्या पडद्यापासून दूर


Leave A Reply

Your email address will not be published.