काळजाला चटका लावणारी बातमी! ज्येष्ठ मराठी दिग्दर्शकाचे निधन; अशोक सराफांसोबत केले होते काम


चित्रपटसृष्टीतून एक वाईट बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ दिग्दर्शक आणि निर्माते माईक पवार यांचे शनिवारी (4 जुलै) निधन झाले आहे. ते 74 वर्षाचे होते. त्यांच्या मागे त्यांच्या कुटुंबात पत्नी, मुलगा, मुलगी, नातवंडं आहेत. ते पुण्यातील हडपसर येथे राहत होते. (Marathi filmmaker Mike pawar passed away)

माईक पवार हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीचे दिग्दर्शक, निर्माते आणि कथा लेखक होते. मराठीमध्ये ‘श्रध्दा’ आणि ‘धडाका’ या दोन चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली होती, तर हिंदीमध्ये ‘हमे जिने दो’ या चित्रपटाची निर्मिती केली होती. तेव्हापासून वैदू समाजातील दिग्दर्शक अशी त्यांची ओळख निर्माण झाली होती.

त्यांनी ‘श्रध्दा’ चित्रपटातील अरुण सरनाईक, अशोक सराफ, कनान कौशल यांच्यासोबत काम केले आहे. त्यांनी ‘धडाका’ चित्रपटाची शूटिंग 1990 मध्ये हडपसर येथे केली होती. या चित्रपटात शम्मी कपूर, राज कपूर, अशोक सराफ, जॉनी लिव्हर हे कलाकार होते.

विशेष म्हणजे माईक पवार यांनी अखिल भारतीय वैदू समाज या संघटनेचे पहिले अध्यक्ष म्हणून काम केले होते. यातूनच त्यांनी वैदू समाजाच्या विकासासाठी काम केले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.