Sunday, September 8, 2024
Home मराठी ‘फौजी’ या चित्रपटात शाहबाज खान आणि टिनू वर्मा दिसणार खलनायकाच्या रुपात

‘फौजी’ या चित्रपटात शाहबाज खान आणि टिनू वर्मा दिसणार खलनायकाच्या रुपात

चित्रपटामध्ये नायकाप्रमाणेच खलनायकालाही तितकेच महत्त्व आहे. खरंतर या खलनायकांमुळेच नायकाचे अस्तित्व असते असे म्हटल्यास वावगे ठरू नये. आजवर बऱ्याच कलाकारांनी खलनायकी भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात दहशत निर्माण करण्याचं काम केलं आहे. आपल्या अनोख्या शैलीमुळे खलनायकी भूमिका साकारणारे कलाकार तर नायकांइतके लोकप्रियही झाले आहेत. आगामी ‘फौजी’ या मराठी चित्रपटात हिंदीतील शाहबाज खान आणि टिनू वर्मा या दोन सशक्त अभिनेत्यांची झलक आपल्याला खलनायकाच्या रुपात दिसणार आहे. हिंदी चित्रपटांचा पडदा गाजविल्यानंतर आता मराठी चित्रपटातही ते आपला खलनायकी अवतार दाखविण्यास सज्ज झाले आहेत. मातृपितृ फिल्म्स् प्रस्तुत घनशाम विष्णुपंत येडे निर्मित- लिखित-दिग्दर्शित ‘फौजी’ हा मराठी चित्रपट येत्या ३० ऑगस्टला चित्रपटगृहात दाखल होत आहे.

‘फ़ाइट मास्टर’ म्हणून टिनू वर्मा यांची हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतंत्र ओळख आहे. शाहबाज खान यांनी छोट्या आणि मोठ्या पडद्यावर अनेक लोकप्रिय खलनायकी भूमिका साकारल्या आहेत. ‘फौजी’ या चित्रपटात अतिशय धूर्त, निर्दयी रूपात हे दोन्ही खलनायक दिसणार आहेत. आपल्या भूमिकेबद्दल बोलताना हे दोन्ही कलाकार सांगतात कि, जबरदस्त अॅक्शन यात असून निर्ढावलेला खलनायक आपल्याला हवं ते मिळवण्यासाठी वाट्टेल ते करतो. अशा प्रकारच्या भूमिकांसाठी एक प्रकारचा आवेग असतो तो यात असून शारीरिक हालचाली आणि चेहऱ्यावरील हावभावांच्या जोरावर आम्ही या भूमिकेत रंग भरले आहेत. प्रेक्षकांना ते पहायला नक्कीच आवडतील असा विश्वास या दोन्ही कलाकारांनी व्यक्त केला.

‘फौजी’ चित्रपटात या दोघांसोबत सौरभ गोखले, प्राजक्ता गायकवाड, अरुण नलावडे, नागेश भोसले, संजय खापरे, अश्विनी कासार, सिद्वेश्वर झाडबुके, हंसराज जगताप, विवेक चाबुकस्वार, सुनील गोडबोले, रोहित चव्हाण, प्रग्या नयन, जान्हवी व्यास, कल्याणी चौधरी, मंजुषा खत्री, घनशाम येडे हे कलाकार आहेत.

चित्रपटाचे निर्माते-लेखक-दिग्दर्शक घनशाम विष्णुपंत येडे आहेत. सहनिर्मात्या सौ.स्वप्नजा विश्वनाथ नाथ आहेत. विशेष कार्यकारी निर्माता प्रथमेश बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, शिवाजी घमाजी दडस तर विशेष निर्मिती सहकार्य विष्णुपंतभाऊ नेवाळे यांचे आहे. अनमोल निर्मिती सहकार्य सतीश नाझरकर, डॉ. शंकर तलबे, उद्धव गावडे, अशोक गाढे, राजेश चव्हाण, गणेश गुंजाळ, एस.पी. गावडे, ज्योतीराम घाडगे, कुमार परदेशीं, राजेंद्र कर्णे , प्रविण बुरुंगे याचे आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा – 

सत्तरच्या दशकातला अँग्री यंग मॅन पुन्हा एकदा पडद्यावर अवतरणार ! सलीम – जावेद यांचा प्रवास जवळून बघता येणार…
या परप्रांतीयांना घरातून हुसकावून दे महाराजा; अभिजित केळकरची बिग बॉसच्या सदस्यावर संतापजनक पोस्ट…

हे देखील वाचा