Friday, December 6, 2024
Home मराठी आपण शोधायचं का रोहित चौहानला? ११ ऑक्टोबरला ‘लाईक आणि सबस्क्राईब’मध्ये होणार उलगडा

आपण शोधायचं का रोहित चौहानला? ११ ऑक्टोबरला ‘लाईक आणि सबस्क्राईब’मध्ये होणार उलगडा

हॅशटॅग, लाईक, शेअर, सबस्क्राईब हे शब्द हल्लीच्या जीवनातील अविभाज्य भाग बनले आहेत. याच धाटणीवर आधारित ‘लाईक आणि सबस्क्राईब’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच या चित्रपटाची सोशल मीडियावर घोषणा करण्यात आली असून येत्या ११ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मोशन पोस्टरमध्ये ‘आपण शोधायचं का रोहित चौहानला? ‘ असा प्रश्न विचारण्यात आला असून हा रोहित चौहान नक्की कोण आणि त्याचा ‘लाईक आणि सबस्क्राईब’शी काय संबंध? हे जाणून घेणे औस्त्युक्याचे ठरणार आहे. दरम्यान पहिली झलक पाहाता हा रहस्यपट असल्याचे कळतेय. त्यामुळे आता प्रेक्षकांना रोहित चौहानला जाणून घेण्याची प्रचंड उत्सुकता लागली आहे.

नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत, एस. एन. प्रॉडक्शन्स एलएलपी आणि अभिषेक मेरूकर प्रॉडक्शन्स यांच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य, अभिषेक मेरूकर निर्माते असून ‘लाईक आणि सबस्क्राईब’चे लेखन आणि दिग्दर्शन अभिषेक मेरूकर यांनी केले आहे. यात अमेय वाघ, अमृता खानविलकर, शुभंकर तावडे, विठ्ठल काळे, जुई भागवत अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शक घोषणेबाबत म्हणतात, “सोशल मीडिया सध्या सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय बनला असून ‘लाईक आणि सबस्क्राईब ‘ या दोन क्रिया आपण रोजच्या जीवनात करतच असतो. अगदी वयस्कांपासून लहान मुलांच्या तोंडी हे शब्द सर्रास असतात. अनेकांना प्रश्न पडला असेल, की हे ‘लाईक आणि सबस्क्राईब’, रोहित चौहान काय प्रकरण आहे, तर याचा उलगडा ११ ऑक्टोबरला होणार आहे.”

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

उत्कंठावर्धक ‘लाईफलाईन’चा टिझर प्रदर्शित, एकदा पाहाच
‘त्यांच्या छातीवर गोळी लागली..’ डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या गोळीबारावर कंगना रणौतची प्रतिक्रिया

हे देखील वाचा