‘खुलता कळी खुलेना’ मालिकेला ५ वर्षे पूर्ण; ‘काही नात्यांना नाव नसतं’, म्हणत मयुरी देशमुखने दिला जुन्या आठवणींना उजाळा


मनोरंजनाच्या दृष्टीने चित्रपटांइतकेच मालिकेला देखील महत्त्व आहे. मालिकांमुळे प्रेक्षक दररोज आवर्जून टीव्हीसमोर बसतात. यातील पात्र आणि मालिकेतील कहाणी त्यांना अगदी जवळची वाटू लागते. यातील काही मालिका अशा असतात, ज्यांना प्रेक्षक कधीच विसरत नाहीत. म्हणजेच, त्या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला तरीही तरीही ती मालिका आणि त्यातले कलाकार प्रेक्षकांच्या मनात जिवंत राहतात.

अशीच एक मालिका म्हणजे ‘खुलता कळी खुलेना’. या मालिकेला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिले. यातील कलाकारांना देखील बरीच लोकप्रियता मिळाली. नुकतंच या मालिकेला ५ वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने यातली मानसी अर्थातच अभिनेत्री मयुरी देशमुखने एक जुना व्हिडिओ शेअर करून जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. (marathi serial khulta kali khulena complete 5 years mayuri deshmukh share video)

मयुरीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर सेटवरचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये अभिज्ञा भावे, मयुरी देशमुख आणि ओमप्रकाश शिंदे हे तिघेही मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहेत. हा मजेदार व्हिडिओ शेअर करत, मयुरीने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “खुलता कळी खुलेना…काही नात्यांना नावं नसतं…!” चाहते मयुरीच्या या व्हिडिओला खूप प्रेम देत आहेत. सोबतच या मालिकेच्या दुसऱ्या भागाची मागणी देखील करत आहेत.

या मालिकेत अभिज्ञा भावे, मयुरी देशमुख आणि ओमप्रकाश शिंदे हे मुख्य भूमिकेत होते. यांच्या व्यक्तिरेखा त्यावेळी प्रचंड लोकप्रिय झाल्या होत्या. मानसी आणि ओम हे दोघे यात डॉक्टर होते. तसेच या मालिकेचे टायटल सॉंग ‘मी पाहावे तू दिसावे’ खूप हिट झालं होतं. जे गायिका श्रेया घोषालने गायलं होतं.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘केजीएफ चॅप्टर २’ ला मिळतोय भरभरून प्रतिसाद; तब्बल ‘इतके’ व्ह्यूज मिळवून यूट्यूबवर केलाय राडा!

-ब्लु नाईटीमध्ये दिसली रुचिरा जाधव; अभिनेत्रीच्या हॉट अंदाजाने नेटकरी झाले घायाळ

-उर्वशी रौतेलानंतर आता मुनमुन दत्तानेही केली ‘मड बाथ’; जॉर्डनमधील फोटो होतायेत व्हायरल


Leave A Reply

Your email address will not be published.