खूपच गोड! जन्माष्टमीनिमित्त छोट्या मायराचा गोंडस व्हिडिओ झाला व्हायरल, पाहा छोटी राधा

झी मराठी या आपल्या लाडक्या वाहिनीवर अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. प्रेक्षक देखील या मालिकांना जोरदार प्रतिसाद देताना दिसत आहे. यातील एक मालिका प्रेक्षकांचे मुख्य आकर्षण ठरत आहे. ती मालिका म्हणजे ‘माझी तुझी रेशीमगाठ’ होय. या मालिकेतील सगळी पात्र देखील गाजत आहेत. या मालिकेत अनेक प्रसिद्ध कलाकार आहेत. मालिकेत मोहन जोशी, संकर्षण कऱ्हाडे, श्रेयश तळपदे आणि प्रार्थना बेहरे हे कलाकार आहेत. या सगळ्या कलाकारांना एकत्र बघताना प्रेक्षकांना खूप आनंद झाला आहे. यासोबतच आणखी एक पात्र चांगलेच लक्षवेधी ठरत आहे. ते पात्र म्हणजे छोटी परी, म्हणजेच मायरा वैकुळ. मायराने मालिकेच्या प्रोमोपासूनच प्रेक्षकांच्या मनात तिची जागा निर्माण केली आहे. अशातच गोकुळाष्टमीनिमित्त मायराचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

मायराच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून तिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये मायराने साडी घातलेली आहे. यात मायरा खूपच गोड दिसत आहे. तिने नाकात नथ घातली आहे. तसेच कपाळी चंद्राची कोर लावली आहे. या व्हिडिओमध्ये ती दहीहंडी कशी साजरी करतात हे सांगत आहे. तिचा हा क्यूट फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. एवढ्या लहान वयात मायरा सेलिब्रेटी बनली आहे. (mazi tuzi reshimgath fame mayra vaikul’s video viral on social media)

View this post on Instagram

A post shared by Myra Vaikul (@_world_of_myra_official)

मायरा या मालिकेत येण्याआधी पासूनच खूप लोकप्रिय आहे. या आधी देखील तिचे अनेक व्हिडिओ इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे आधीपासूनच तिचा जबरदस्त चाहता वर्ग आहे. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत आल्यापासून तिची लोकप्रियता गगनाला भिडली आहे. नुकतेच मायराचे इंस्टाग्रामवर एक लाख फॉलोवर्स पूर्ण झाले आहेत. या निमित्त तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले होते. (mazi tuzi reshimgath fame mayra vaikul’s video viral on social media)

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अभिनयात येण्यापूर्वी ‘हे’ काम करायची श्रुती हासन; म्हणाली, ‘कोणालाही माहित नव्हते की…’

-Bigg Boss OTT: लाजून लाल झाली शमिता, जेव्हा करणने ‘हॉटनेस’वर प्रश्न विचारताच राकेश म्हणाला…

-‘टायगर ३’साठी कॅटरिना कैफ रशियाला रवाना; स्टंट सीन शूट करण्यासाठी घेतीये प्रचंड मेहनत

Latest Post