Tuesday, May 14, 2024

क्या बात है! मिका सिंगचा आवाज अन् सपना चौधरीचे ठुमके, व्हिडिओ पाहून तुमचेही थिरकतील पाय

अभिनेत्री सपना चौधरी (Sapna Choudhary) ही केवळ हरियाणामध्ये नाही, तर संपूर्ण देशात तिच्या देसी स्टाईल आणि डान्समुळे लोकप्रिय आहे. हरियाणवी गाणी आहेत आणि सपनाचा डान्स नाही असे सहसा होत नाही. ती तिच्या म्युझिक व्हिडिओमुळे आणि तिच्या स्टेज शोमुळे ओळखली जाते. तिच्या कार्यक्रमाची माहिती तिच्या चाहत्यांना समजताच, तिचे चाहते कुठूनही तिचा शो बघण्यासाठी जातात. नुकतेच सपनाचे सुपरहिट ‘तेरी आख्या का यो काजल’ या गाण्याला बॉलिवूड गायक मिका सिंगने गायले आहे. हे गाणे ऐकून ती स्वतः ला थांबवू शकली नाही आणि तिने जोरदार डान्स केला.

सपना चौधरी ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिच्या म्युझिक व्हिडिओसोबत ती तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसाठी शेअर करत असते. नुकतेच तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ कोणत्यातरी कार्यक्रमातील दिसत आहे. या व्हिडिओमध्ये सपनासोबत बॉलिवूड आणि पंजाबी गायक मिका सिंग देखील दिसत आहे. (Mika Singh when sings sapna Choudhary hot sing teri aakhya ka yo kajal see haryanvi queen dance)

मिका सिंग सपना चौधरीचे सुपरहिट गाणे ‘तेरी आंख्या का यो काजल’ हे गाणे गाताना दिसत आहे. यावेळी सपनाने साडी नेसलेली आहे. हा व्हिडिओ शेअर करून तिने लिहिले आहे की, “सदाबहार मिका सिंग.” यासोबत तिने एक ईमोजीही शेअर केला आहे.

मिका सिंगचा आवाज आणि सपना चौधरीचे ठुमके सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. या व्हिडिओमध्ये तिने चंदेरी रंगाची साडी घातली आहे. तसेच मिका सिंग काळ्या रंगाचे जॅकेट आणि टी-शर्टमध्ये दिसत आहे. मिका सिंग गाणे गात आहे, तर सपनाने या गाण्यावर चांगलाच ठेका धरला आहे. या व्हिडिओमध्ये दोघे चांगलीच मस्ती करताना दिसत आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अनन्या पांडेची बहीण लग्नाआधीच प्रेग्नंट? बातमी ऐकताच आईलाही बसला धक्का; म्हणाली, ‘हे कसं…’

-अभिनयाचे मैदान गाजवण्यासाठी उतरलेल्या ‘या’ अभिनेत्याचा बालपणीचा फोटो व्हायरल, सुनील शेट्टीशी आहे जवळचा संबंध

-कडकच ना! अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीझ, पाहायला मिळाली रश्मिकाची बोल्ड स्टाईल

हे देखील वाचा