Friday, April 26, 2024

‘पाहुणा कोण? मी की तुम्ही??’ सिद्धार्थ अन् मितालीला झालं बिबट्याचं दर्शन; खास पोस्ट होतेय व्हायरल

अभिनेत्री मिताली मयेकर आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर हे सोशल मीडियावर सक्रिय राहणारं जोडपं आहे. त्यांच्या आयुष्यातील छोट्या मोठ्या गोष्टी ते चाहत्यांसोबत शेअर करणे पसंत करतात. काही महिन्यांपूर्वी हे जोडपं रेशीमगाठीत अडकलं आहे. तेव्हापासूनच ते सतत चर्चेत येत असतात. नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टमुळे हे दोघे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. वास्तविक सिद्धार्थ आणि मितालीच्या घरामागे त्यांना एका बिबट्याचं दर्शन झालं. याचे काही फोटो त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

मंगळवारी मुंबईतील गोरेगाव वसाहतीमध्ये एक बिबट्या आल्याचं पाहायला मिळालं. याच भागातील एका इमारतीमध्ये सिद्धार्थ आणि मिताली राहत आहेत. त्यांनी बिबट्याला त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केलं आहे. हेच फोटो सिद्धार्थसह मितालीने देखील तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. विशेष म्हणजे फोटोपेक्षा त्याखालील कॅप्शनचीच अधिक चर्चा होतेय.

बिबट्याचा फोटो शेअर करत सिद्धार्थने लिहिलं की, “आमच्या बिल्डिंग च्या मागे आज एक पाहुणा आला होता. बराच वेळ आमच्याकडे टक लावून बघत बसला आणि झुडपात निघून गेला. त्याच्या चेहऱ्यावर एक जखम दिसली. “तुमच्यामुळे झालंय हे” असं नजरेतून सांगत होता. बिल्डिंग मधले सगळे फोटो काढायला खिडकीत आले. मी पण आलो. तो फक्त स्थिर नजरेनं बघत होता आमच्याकडे. त्याचा नजरेतून कळत होतं स्पष्ट की पाहुणा तो नाही, आम्ही आहोत. हे त्याचं घर आहे.” (mitali mayekar siddharth chandekar captured leopard spotted at backyard of house)

सोबतच मितालीनेही तो फोटो शेअर करत जणू काय बिबट्याच्याच डोळ्यातला प्रश्न सर्वांना विचारला आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिलं की, “पाहुणा कोण? मी? की तुम्ही??” एवढेच नव्हे, तर याशिवाय त्यांच्या घरामागील जंगलात त्यांना बिबट्यासोबत हरीण आणि सरड्याचे देखील दर्शन झालेले फोटो पाहायला मिळाले. हे फोटो आता सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सिनेसृष्टीतील जेष्ठ अभिनेते चंद्रशेखर वैद्य यांचे वृद्धापकाळाने निधन; रामायणात साकारली होती ‘आर्य सुमंत’ची भुमिका

-सलीम खान आणि जावेद अख्तर यांच्यावर बनणार डॉक्युमेंट्री; त्यांच्या मुलांच्याच हाती निर्मितीची धुरा

-‘चूडी, पायल, बिंदिया, काजल…’, साडीमध्ये अधिकच खुललं संस्कृती बालगुडेचं सौंदर्य

हे देखील वाचा