‘चूडी, पायल, बिंदिया, काजल…’, साडीमध्ये अधिकच खुललं संस्कृती बालगुडेचं सौंदर्य


सगळेच चित्रपट न स्वीकारता अगदी निवडक चित्रपट करणारी अभिनेत्री म्हणजेच मराठमोळी संस्कृती बालगुडे होय. तिने आजवर अनेक चित्रपटात काम केले आहे. कितीही अवघड भूमिका असुद्या, संस्कृती तिला अगदी सहजतेने पार पाडते. तिच्या याच अंदाजामुळे तिचे लाखो चाहते आहेत. या चाहत्यांसाठी ती दरदिवशी तिचे फोटोशूट नाहीतर मग व्हिडिओ शेअर करते. चाहत्यांकडूनही तिच्या पोस्टला खूप प्रेम मिळते.

संस्कृती बालगुडे सोशल मीडियावर सक्रिय राहणे पसंत करते. अलीकडेच तिने शेअर केलेले तिचे फोटो आता सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय बनले आहेत. वास्तविक हे साडीतील फोटोशूट आहे, जे अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

संस्कृतीने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये, तिची अप्रतिम सुंदरता पाहायला मिळत आहे. यात तिने लाल ब्लाऊजसह हलक्या निळ्या रंगाची साडी परिधान केली आहे. अतिरिक्त दागिने न घातला फक्त हातात एक बांगडी आणि जड कानातले घालून, संस्कृतीने आपला हा स्टायलिश अन् ट्रॅडिशनल लूक पूर्ण केला आहे. सोबतच तिने मेसी पोनी घातली आहे, ज्याने तिच्या सुुंदरतेला चार चॉंद लावले आहेत. (actress sanskruti balgude shared pictures in saree fans skipped heart beat)

यातील तिच्या अदा पाहून, कोणीही सहज तिच्या प्रेमात पडेल. संस्कृतीच्या सुंदरतेचे दर्शन घडवून देणारे हे फोटो बघता बघताच सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तिने फोटोखाली कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “चूड़ी, पायल, बिंदिया, काजल, गजरा सब पड़े रहने दो.. खींच के बाँधो ज़ुल्फ़ों को और एक लट गाल पे रहने दो..!” अभिनेत्रीचं हे फोटोशूट नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरलं आहे. यामुळेच फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडलेला पाहायला मिळत आहे.

अभिनेत्रीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती अखेरच्या वेळेस ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ या चित्रपटात दिसली होती. तर लवकरच ती ‘८ दोन ७५: फक्त इच्छाशक्ती हवी’ या आगामी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात संस्कृतीसोबत, अभिनेता शुभंकर तावडे, शर्वाणी पिल्लई, संजय मोने, आनंद इंगळे, ,राधिका हर्षे, अश्विनी कुलकर्णी, विजय पटवर्धन, चिन्मय संत, डॉ .निखिल राजेशिर्के असे कलाकार काम दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘अभिनेता बनण्यासाठी आलोय, पॉर्नस्टार नाही’, इंटिमेट सीनवर ‘बिग बॉस’ फेम पारस छाबडाचे वक्तव्य

-‘आई नक्कीच खुश होईल’, म्हणत जेमी लिव्हरने केले लेहंग्यातील ग्लॅमरस फोटो शेअर

-मराठमोळ्या पर्ण पेठेच्या दिलखेचक फोटोची चाहत्यांना भुरळ; एक नजर टाकाच


Leave A Reply

Your email address will not be published.