Friday, April 26, 2024

बीग बॉसमध्ये लग्न केलेल्या ‘त्या’ जोडप्याने साजरा केला लग्नाचा चौथा वाढदिवस

टॉप ५ भोजपुरी अभिनेत्रींनपैकी एक मोनालिसाच्या लग्नाला नुकतीच चार वर्षे पूर्ण झाली आहेत. पती विक्रांतसोबत लग्नाचा चौथा वाढदिवस साजरा करताना तिने इंस्टाग्रामवर सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हे जोडपं रोमँटिक मूडमध्ये दिसतंय. कधी केक कापताना, कधीकधी एकमेकांना केक भरवत असताना, जोडपे अत्यंत रोमँटिक शैलीत पोज देताना दिसलं आहे. यादरम्यान मोनालिसा हॉल्टर नेक रेड ड्रेसमध्ये खूप ग्लॅमरस दिसत होती.

लग्नाच्या वाढदिवसानिमित्त मोनालिसाचा पती विक्रांतनेही काही रोमँटिक फोटोज इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत आणि लिहिलय, ‘अच्छा ऐका… लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, मला असे वाटते की जेव्हा आपण भेटतो तेव्हा देवाने आपल्यासाठी एक योजना तयार केली असेल. आपण एकमेकांवर प्रेम केले पाहिजे आणि कायमस्वरूपी असंच एकमेकांचं हात धरून पुढे गेले पाहिजे.’

मोनालिसा आणि विक्रांत यांचं लग्न इतरांपेक्षा हटके होते कारण त्यांनी बिग बॉस १० मध्ये नॅशनल टीव्हीवर लग्न करून सर्वांना चकित केलं होतं. जेव्हा विक्रांत आणि मोनालिसा बिग बॉसचा भाग बनले, त्या आधीपासून दोघे बर्‍याच वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. या प्रकरणात निर्मात्यांनी दोघांकडेही शोमध्येच लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला आणि अशा प्रकारे दोघांनीही बिग बॉस मध्ये लग्न केलं होतं.

मोनालीसाने आतापर्यंत तौबा तौबा, झिद्दी आशिक, जगदम, सुहाग, प्रतिज्ञा, जलवा,राजा बाबू देवरा बडा सतावेला अशा अनेक भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

हे देखील वाचा