प्रतीक्षा संपली! लोकप्रिय वेबसीरिज ‘मनी हाईस्ट’चा ५वा सिझन रिलीझ; पण कुठे आणि केव्हा पाहू शकता?

नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील लोकप्रिय थ्रिलर वेबसीरिज ‘मनी हाईस्ट’ पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. याचे शेवटचे पर्व शुक्रवारी (३ सप्टेंबर) प्रदर्शित झाले. नेटफ्लिक्सच्या या क्राईम वेबसीरिजची प्रेक्षक बऱ्याच काळापासून वाट पाहत होते. या वेबसीरिजबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. अशातच ‘मनी हाईस्ट ५’ पर्वाचा पहिला भाग शुक्रवारी दुपारी १२:३० वाजता प्रदर्शित झाला.

‘मनी हाईस्ट’चे ५वे पर्व पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. नेटफ्लिक्सने चाहत्यांची क्रेझ पाहताच इमोजी देखील जारी केले होते. नेटफ्लिक्सने आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट शेअर करत लिहिले होते की, “जर तुम्हाला हे इमोजी दिसले, तर तुम्हाला मास्क घालण्याची वेळ आली आहे. कारण ‘मनी हाईस्ट’ उद्या येणार आहे.”

दुसरा भाग ३ डिसेंबरला होणार प्रदर्शित
या पर्वाचा दुसरा भाग ३ डिसेंबर रोजी दुपारी १:३० वाजता प्रदर्शित झाला. गेल्या पर्वामध्ये जबरदस्त मनोरंजन करणाऱ्या या मालिकेच्या अंतिम पर्वाबद्दल प्रेक्षक खूप उत्साहित आहेत. प्रोफेसरांची टीम यावेळी काय करते तसेच प्रोफेसर आणि एलिसिया लढाई कशी संपणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

‘मनी हाईस्ट’ वेबसीरिज आहे स्पॅनिश भाषेत
‘मनी हाईस्ट’ ही स्पॅनिश भाषेतील वेबसीरिज आहे. याचे अंतिम पर्व शुक्रवारी जगभरात प्रदर्शित झाले. हा १० भागांचा एपिसोड दोन भागांमध्ये प्रदर्शित होईल. त्याच्या पहिल्या एपिसोडमध्ये ५ भाग असतील, जे शुक्रवारपासून नेटफ्लिक्सवर प्रसारित केले जात आहेत. उर्वरित पाच एपिसोडसाठी प्रेक्षकांना ३ महिने वाट पाहावी लागणार आहे.

‘हे’ पाच एपिसोड होणार प्रदर्शित
‘मनी हाईस्ट ५’मध्ये पाच एपिसोड प्रदर्शित होणार आहे. त्यातील पहिल्या एपिसोडचे नाव ‘द एंड ऑफ द रोड’, दुसऱ्या एपिसोडचे नाव ‘डू यू बिलिव्ह इन रीइनकार्नेशन?’, तिसऱ्या एपिसोडचं नाव ‘वेलकम टू द शो ऑफ लाईफ’, चौथ्या एपिसोडचे नाव ‘योर प्लेस इन हेव्हन’ आणि पाचव्या एपिसोडचे नाव ‘लिव्ह मेनी लाईव्ह्ज’ असे आहे.

हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्येही ‘मनी हाईस्ट’ आहे उपलब्ध
प्रेक्षकांना ‘मनी हाईस्ट’च्या पाचव्या पर्वाची वाट पाहण्याचे कारण म्हणजे प्रोफेसर आणि त्यांची टीम अशा परिस्थितीत अडकली आहे, जिथे सुटका होणे शक्य नाही. अशा परिस्थितीत, प्रोफेसर आपल्या टीमला वाचवण्यासाठी काय योजना आखतात हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता आहे. २०२० च्या चौथ्या पर्वात ८ भाग होते. स्पॅनिश व्यतिरिक्त, हा शो नेटफ्लिक्सवर इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये उपलब्ध आहे. भारतातील मालिकेच्या लोकप्रियतेमुळे त्याचा हिंदी ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-प्रसिद्ध दिग्दर्शकाने बॉलिवूडचं काळं सत्य आणलं बाहेर; म्हणाले, ‘इथं एवढं जोरात मारलं जातं की…’

-कोणासोबत राहतात अभिनेते दिलीप प्रभावळकर? जाणून घ्या ‘पछाडलेला’मधील इनामदार भुसनाळेच्या कुटूंबाबद्दल

-सिद्धार्थचा अंतिम प्रवास सुरू, लवकरच होणार पंचतत्वात विलीन

Latest Post