‘तिने माफी मागावी नाही तर’, कंगनाने शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त ट्वीट केल्यामुळे तापले काँग्रेसचे कार्यकर्ते

MP Congress Warns Kangana Ranaut To Apologize On Tweets Against Farmers Protest


‘पंंगा क्वीन’ आपल्या रोखठोक भूमिकेमुळे नेहमीच चर्चेचा विषय ठरत असते. अशाच प्रकारे ती आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मागील अडीच महिन्यांपासून देशात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत तिने ट्वीट केले होते. त्यामुळे मध्यप्रदेशच्या बेतूल जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी तिच्याविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी धमकी दिली आहे की, कंगनाने जर १२ फेब्रुवारीपर्यंत आपल्या ट्वीटसाठी माफी मागितली नाही, तर ते बेतूलमध्ये सुरू असलेल्या कंगनाच्या ‘धाकड’ सिनेमाचे शूटिंग होऊ देणार नाहीत.

दुसरीकडे या प्रकरणावर राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी म्हटले की, ‘सरकार निश्चित करेल की, बहीण- मुलगी कंंगनाला शूटिंग करण्यात कोणतीही अडचण होऊ नये.’ त्यांनी पुढे म्हटले की, बेतूल एसपीला सांगण्यात आले आहे की प्रदेशातील शांततेचे भंग करण्याचा प्रयत्नांवर कठोर कारवाई करण्यात यावी.

गृहमंत्र्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना विनंती केली की, ते आपल्या कार्यकर्त्यांना अशाप्रकारच्या गोष्टी करण्यापासून रोखावे. कारण कंगनाच्या सिनेमाची शूटिंग बेतूलच्या सारणी विभागात सुरू आहे.

राज्यातील काँग्रेसच्या सेवा दलाचे सचिव मनोज आर्या आणि चिचोली ब्लॉक काँग्रेस समितीचे अध्यक्ष नेकराम यादव यांंनी बुधवारी (१० फेब्रुवारी) बेतूलच्या तहसीलदारांना निवेदन दिले. दुसरीकडे बेतूलचे एसडीपीओ यांनी सांगितले की, माफी न मागितल्याने कंगनाच्या सिनेेमाच्या शूटिंगबाबत काँग्रेस कार्यकर्त्यांनी एसपीलाही निवेदन दिले आहे. सोबतच १२- १३ फेब्रुवारीला तिच्याविरुद्ध विरोध प्रदर्शन करण्याचेही म्हटले आहे.

बेतूलमध्ये काँग्रेसचे नेता समीर खान यांनी म्हटले की, ‘कंगना रणौतने शेतकऱ्यांना आतंकवादी आणि चीनी एजंट म्हटले आहे. यावर तिने माफी मागितली नाही, तसेच तिच्याविरुद्ध एफआयआर दाखल झाली नाही, तर आम्ही १३ फेब्रुवारीला सारनीसाठी रॅली काढू. सोबतच तिच्या सिनेमाचे शूटिंगही रोखू.’

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही वाचा-

-शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत सोनाक्षीने पोस्ट केली भावनिक कविता, पाहा व्हिडिओ
-वाढदिवस! लग्न समारंभात पाहताच क्षणी टीना मुनीम यांच्या प्रेमात पडले होते अनिल अंबानी; असे जुळले होते लग्न
-Video: हेल्मेट न घालता बाईकवर स्टंट करणे जॉन अब्राहमला पडले महागात; नेटकऱ्यांनी शिकवला चांगलाच धडा
-तेलुगु अभिनेत्रीने ‘सैंया जी’ गाण्यावर केला भन्नाट डान्स; सोशल मीडियावर चाहते झाले घायाळ, पाहा व्हिडिओ

 


Leave A Reply

Your email address will not be published.