एकेवेळी देशातील तरुणाईला वेड लावणारा ‘तो’ अभिनेता पुढे झाला गायब, आज २० वर्षांनी सत्य आले समोर


जर तुम्ही ‘तुमसे अच्छा कौन है’ सिनेमा पाहिला असेल तर तुम्हाला नकुल कपूर नक्की आठवेल. या सिनेमात नकुलने मुख्य भूमिका साकारली होती. तर अभिनेत्रीच्या भूमिकेत किम शर्मा व आरती छाब्रिया होत्या. या सिनेमातील नकुलचा देशी अंदाज सर्वांनाच आवडला. या चित्रपटातील भुमिकेमुळे नकूल रातोरात भारतात स्टार बनला. परंतू त्यानंतर मात्र हा अभिनेता फारसा कुठे दिसला नाही. चला तर आजच्या या लेखात त्याच नकुल कपूरबद्दल जाणून घेऊयात.

तुमसे अच्छा कौन है सिनेमात लोकप्रिय झालेल्या नकुल कपूरला चाहते आता जवळपास विसरले आहेत. एकेवेळी हा अभिनेता चाहते, मुली यांच्या ह्रदयावर राज्य करत होता. पहिल्याच चित्रपटानंतर मुली त्याच्या दिवान्या झाल्या होत्या.

नकुलने आपल्या कारकिर्दीची सुरूवात १९९८मध्ये ‘हो गई है मोहब्बत तुमसे’ या अल्बममधून केली होती. त्यानंतर २००१मध्ये त्याने ‘आजा मेरे यार’ या सिनेमात काम केले परंतू हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपटला. यानंतर २००२ नकुलसाठी खास ठरलं. यावर्षी आलेल्या ‘तुमसे अच्छा कौन है’ सिनेमाने त्याला रातोरात स्टार केले.

या सिनेमानंतर त्याने लोकप्रियता व पैसे चांगलेच कमावले. परंतू स्टारडम मात्र नकुलला सांभाळता आले नाही. या चित्रपटाचे गाणे जबरदस्त हिट्स झाले. परंतू यानंतर नकुलला काही विशेष ऑफर मिळाल्या नाहीत. त्यानंतर २००५ साली या अभिनेत्याला टर्मिनल सिटी या सिरीयलमध्ये काम करावे लागले. बराच काळ यश मिळत नसल्याचे पाहून नकुलने बॉलीवूडबरोबर नाते तोडण्याचा निर्णय़ घेतला.

त्यानंतर नकुलबद्दल कोणतीही माहिती किंवा वृत्त समोर आले नाही. त्यानंतर चाहत्यांनी त्याला इंटरनेटवर शोधायला सुरुवात केली. त्यात अनेक वेळा त्याच्या मृत्यूच्या बातम्या समोर येत होत्या. त्यामुळे चाहत्यांना त्याबद्दल जाणून घ्यायचे होते. सध्या हाच नकुल कॅनडा देशात आहे. योगा इंस्ट्रक्टर बनलेला नकुल तेथे लोकांना योगाचे शिक्षण देतो. सध्या तो या कामाचा आनंद घेत आहे. तसेच काही रिपोर्ट्सनुसार नकुलला योगाचा चांगला इंस्ट्रक्टर होण्याचे स्वप्न होते. सध्या नकुल याच कामातून पैसे कमावून घर चालवतो.


Leave A Reply

Your email address will not be published.