Saturday, June 29, 2024

‘वेलकम 3’ चित्रपटातून बाहेर पडल्याबद्दल नाना पाटेकरांची प्रतिक्रिया; म्हणाले, ‘मी खूप…’

‘द व्हॅक्सिन वॉर’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रटात प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी देखील चांगली भूमिका साकारली आहे. त्यामुळे ते  सध्या चर्चेत आले आहेत. बुधवारी (13 सप्टेंबर) या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून हा चित्रपट 28 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होण्याच्या काही दिवस आधी अक्षय कुमारने त्याच्या वाढदिवसानिमित्त ‘वेलकम 3‘ चित्रपटाचा टीझर शेअर करून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती.

‘वेलकम 3’ची घोषणा अक्षय कुमारने केली आहे. त्याच्या या चित्रपटाला चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले. मात्र, त्यात अभिनेते नाना पाटेकर दिसले नाहीत. नाना पाटेकर यांच्या अनुपस्थितीमुळे चाहतेही निराश झाले होते. कारण ‘वेलकम’ या चित्रपटांमधील नाना पाटेकर यांची भूमिका चाहत्यांना खूप आवडली होती. ‘वेलकम’ आणि ‘वेलकम 2’ या चित्रपटात त्यांनी उदय शेट्टीची भूमिका केली होती, जी खूप गाजली.

अक्षय कुमारचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. अक्षय कुमार सोशल मीडियावर सक्रिय असतो. अक्षय कुमारच्या चित्रपटांची त्याचे चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. चित्रपटाच्या पहिल्या दोन भागांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. लोक चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत होते, पण लोक या चित्रपटातील मजनू भाई आणि उदय भाई यांच्या पात्रांना मुकणार आहेत. या चित्रपटाचा भाग नसल्याबद्दल नानांनी प्रतिक्रिया दिली आहे. जी सध्या चर्चेत आली आहे.

नाना पाटेकर यांना या चित्रपटातील भूमिके विषयी विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले, “मी त्याचा भाग नाही, कदाचित त्यांना वाटत असेल मी आता खूप म्हातारा झालो.” ते पुढे म्हणाले, “उद्योग हा कधीच कोणासाठी बंद नसतो. तुम्हाला चांगले काम करायचे असेल तर लोक तुमच्याकडे येतील. आपण हे करू शकता हे आपल्याला माहित असले पाहिजे. ही माझी शेवटची संधी आहे असा विचार करून, आपण त्यात इतके जीव ओतले पाहिजे. त्यामुळे सर्वांना काम मिळते. हे फक्त तुम्हाला करायचे आहे की नाही यावर अवलंबून आहे.” त्याचे हे वक्तव्य चांगलच चर्चेत आले आहे. (Nana Patekar spoke candidly about not being a part of Akshay Kumar film Welcome 3)

अधिक वाचा-
नाद करा पण आमचा कुठं! शाहरुखच्या ‘जवान’ला टक्कर देत ‘ड्रीम गर्ल 2’ने केली तब्बल 100 कोटींची कमाई
‘हम तो दिवाने’चा टीझर रिलीझ, उर्वशी रौतेलाचा अन् एल्विश यादवच्या रोमान्सने तोडल्या सगळ्या मर्यादा

हे देखील वाचा