Tuesday, February 4, 2025
Home बॉलीवूड अभिनेते नसीरुद्दीन शाह देतायेत ‘या’ गंभीर आजाराशी झुंज, स्वतः मुलाखतीत केलाय खुलासा

अभिनेते नसीरुद्दीन शाह देतायेत ‘या’ गंभीर आजाराशी झुंज, स्वतः मुलाखतीत केलाय खुलासा

नसीरुद्दीन शाह हे बॉलिवूडचे एक प्रसिद्ध अभिनेते आहेत. त्यांनी ‘मोहरा’, ‘सरफरोश’ आणि ‘ए वेन्सडे’ यांसाख्या सुरपरहीट चित्रपटात काम केले आहे. अशातच त्यांनी एका मुलाखतीत खुलासा केला आहे की, त्यांना ओनोमॅटोनिया नावाचा आजार झाला आहे. या स्थितीत एखादी व्यक्ती कोणत्याही कारणाशिवाय शब्द, वाक्य किंवा कविता बोलत राहते. त्यांनी सांगितले की, झोपताना देखील ते या स्थितीत असतात.

नसीरुद्दीन शाह (nasiruddin shah) यांनी सांगितले की, “मी ओनोमॅटोनिया नावाच्या आजाराशी लढत आहे. याला कोणतेही कारण लागत नाही. मी जेव्हा झोपतो तेव्हा देखील या स्थितीत असतो. तुम्हाला जर विश्वास नसेल, तर तुम्ही याबाबत डिक्शनरीमध्ये देखील बघू शकता. ही एक मेडिकल स्थिती आहे.

यावेळी त्यांनी त्यांची पत्नी रत्ना शाह आणि त्यांच्या रिडींग लिस्टबाबत सांगितले. त्यांनी सांगितले की, आम्ही दोघे अनेकवेळा एकमेकांना पुस्तकांबाबत सांगत असतो. यासोबत त्यांनी एक खुलासा केला की, त्यांच्या पत्नीला टिन टिन कॉमिक खूप आवडते.

नसीरुद्दीन शाह आणि त्यांची पत्नी रत्ना शाह नुकतेच सना कपूरच्या लग्नात सामील झाले होते. त्यांनी लग्नात अनेक फोटो देखील काढले होते. जे सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले होते. त्यांच्या चाहत्यांना देखील त्यांचे हे फोटो खूप आवडले होते.

नसीरुद्दीन शाह यांनी ‘गहराइया’ चित्रपटात दीपिका पदुकोणच्या वडिलांची भूमिका निभावली होती. शकुन बत्रा यांचा हा चित्रपट अमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदी मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटात त्यांनी अत्यंत बोल्ड सीन्स केले आहेत. ज्यामुळे त्यांना काही प्रमाणात ट्रोल देखील केले आहे. परंतु चित्रपटाला काहींनी तेवढीच पसंती देखील दर्शवली आहे. यासोबतच नसीरुद्दीन शाह यांची ‘शिखरवटी’ ही वेबसिरीज देखील प्रदर्शित झाली आहे. यात लारा दत्ता, सोहा अली खान आणि कृतिका कामरा देखील दिसत आहे.

हेही वाचा :

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा