Tuesday, June 25, 2024

काय सांगता! दाक्षिणात्य इंडस्ट्रीमधील ‘ही’ लेडी सुपरस्टार करणार अभिनयाला रामराम

दाक्षिणात्य इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा संपूर्ण देशात किंबहुना जगभरात प्रसिद्ध आहे. तिने तिच्या अभिनयाने सर्वानाच वेड लावले. मात्र आता नयनताराच्या फॅन्ससाठी एक वाईट बातमी येत आहे. नयनताराने अभिनयापासून ब्रेक घेण्याचे ठरवले आहे. असे सांगितले जात आहे की, ती आता चित्रपटांमध्ये दिसणार नाही. नयनताराने वैयक्तिक कारणांमुळे अभिनयापासून दूर होण्याचे ठरवले आहे.

नयनताराला तिचे पूर्ण लक्ष तिच्या जुळ्या मुलांच्या संगोपनासाठी दयायचे आहे. मागच्या वर्षी नयनतारा सरोगसीच्या माध्यमातून दोन जुळ्या मुलांची आई झाली. माहितीनुसार नयनतारा आता मुलांचे संगोपन करण्यासोबतच तिच्या नवऱ्याचे प्रोडक्शन हाऊस देखील सांभाळणार आहे. या बातम्यांवर अजूनपर्यंत नयनताराकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. मात्र आता तिच्या या निर्णयामुळे तिच्या फॅन्समध्ये नाराजीचा सूर आहे.

तत्पूर्वी नयनतारा शाहरुख खानसोबत ‘जवान’ या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन एटली कुमार करत असून, सिनेमाची सध्या शूटिंग चालू आहे. यासोबतच तिच्या कडे अजून अनेक मोठे सिनेमे आहेत. नयनतारा तिच्या ७५ वा सिनेमा असलेल्या ‘लेडी सुपरस्टार 75’ सिनेमात लवकरच दिसणार आहे. सोबतच ती तिच्या नवऱ्याचे दिग्दर्शन असलेल्या सिनेमात देखील दिसणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीने सोशल मीडियाला अचानक ठोकला रामराम, पोस्ट शेअर करत दिली माहिती
अत्यंत वादग्रस्त : ‘स्वरा भास्कर जर हजारो पुरुषांसोबत रात्र घालवणार…’, अयोद्धेतील महंताच्या विधानाने खळबळ

 

हे देखील वाचा