लेक रिद्धिमासोबत ‘द कपिल शर्मा शो’मध्ये दिसणार नीतू कपूर; कपिलसोबतचा फोटो शेअर करत म्हणाल्या…

‘द कपिल शर्मा शो’चे नवीन पर्व सुरू झाले आहे. नवीन पर्व सुरू होताच, शोमध्ये कलाकार हजेरी लावत आहेत. द कपिल शर्मा शोचे चाहते बऱ्याच काळापासून वाट पाहत होते. दुसरीकडे, कपिल पुन्हा एकदा विनोद घेऊन परतला आहे. अभिनेत्री नीतू कपूर आणि त्यांची मुलगी रिद्धिमा कपूर साहनी या शोच्या आगामी भागांमध्ये दिसणार आहेत. नीतू कपूर यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर करून याबाबत माहिती दिली आहे.

इंस्टाग्रामवर फोटो शेअर करताना नीतू कपूर यांनी लिहिले की, “कपिल शर्मासोबत वेळ घालवताना नेहमीच मजा येते. यावेळी रिद्धिमाने हे आणखी मनोरंजक बनवले आहे. हे आनंदाचे क्षण कपिल शर्मा आणि सोनी टीव्हीशी जोडलेले आहे.”

View this post on Instagram

A post shared by neetu Kapoor. Fightingfyt (@neetu54)

तसेच रिद्धिमानेही इंस्टाग्रामवरून फोटो शेअर केला. “कालची संध्याकाळ आई आणि कपिल शर्मासोबतची सर्वोत्तम संध्याकाळ होती,” असे फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

फोटोमध्ये नीतू आणि रिद्धिमा खूप आनंदी दिसत आहेत. अलीकडेच नीतू ‘इंडियन आयडल १२’ च्या एका भागातही दिसल्या होत्या. यापूर्वीही अनेक स्टार्स शोमध्ये आले आहेत. हा कार्यक्रम प्रत्येक शनिवार आणि रविवारी रात्री ९.३० वाजता सोनी टीव्हीवर प्रसारित केला जातो. ‘द कपिल शर्मा’ शोचे दुसरे पर्व या वर्षातील फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात बंद झाले. काही काळानंतर शोच्या तिसऱ्या पर्वाची सुरुवात करण्यात आली.

दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण योजना उद्ध्वस्त केली, पण २१ ऑगस्टपासून त्याचे तिसरे पर्व दणक्यात सुरू झाले आहे. पहिल्याच भागात अजय देवगणने हजेरी लावली होती, त्यामुळे शोचा पहिला भाग खूप मजेत पार पडला. तर दुसऱ्या भागात अक्षय कुमारने आपले सामान बांधले आणि बाहेर पडला. मात्र, आता आगामी भागात कोणते दिग्गज कलाकार हजेरी लावणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

दुसरीकडे नीतू कपूरबद्दल बोलायचे झाले, तर ती लवकरच ‘जुग जुग जिओ’ चित्रपटात दिसणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘राधा कैसे ना जले…’, म्हणत ‘धकधक गर्ल’ने पुन्हा एकदा चुकवला चाहत्यांचा काळजाचा ठोका

-‘या’ कलाकारांनी किस करून लावली होती पडद्यावर आग; आमिर अन् करिश्माचाही आहे समावेश

-‘दिल को करार आया!’ तुझ्यात जीव रंगला फेम ‘वहिनीसाहेबां’चे एक्सप्रेशन्स पाहुन चाहते झाले पुरते घायाळ

Latest Post