बाबो! शाहरुख खानच्या ‘रा- वन’ चित्रपटातील ‘या’ गाण्यावर लागली होती तब्बल ५ कोटी रुपयांची पैज


बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान आजकाल कोरोना साथीच्या आजारामुळे आपल्या घरीच आहे. शाहरुख खान सुरुवातीपासूनच आपल्या चित्रपटातील सर्वोत्कृष्ट कामांबद्दल चर्चेत आहे. जिथे अभिनेत्याने चित्रपट दिग्दर्शकांसोबत अनेक वेळा कोट्यवधी रुपयांची पैज पण लावली आहे. वृत्तानुसार, शाहरुख खान म्हणतो की, त्याने आपल्या ‘रा-वन’ चित्रपटात बरीच गुंतवणूक केली होती. चित्रपटाचे दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्यासोबत ५ कोटींची पैज लावण्यात आली होती. ही पैज चित्रपटातील गाण्याशी संबंधित होती.

अमेरिकेचा जगप्रसिद्ध गायक एकॉन याला या चित्रपटातील ‘छम्मक छल्लो’ गाण्यासाठी भारतात बोलावले होते. या चित्रपटातील दोन गाणी त्याने गायली होती. पहिले गाणे छम्मक छल्लो होते, तर या चित्रपटातील दुसरे गाणे क्रिमिनल होते. या गाण्याबद्दल बोलताना अनुभव सिन्हा म्हणाले की, ‘शाहरुख खानबरोबर या दोन्ही गाण्यांवर मी पैज लावली आहे.’ ते म्हणतात, ‘शाहरुख खानबरोबर मी एक पैज लावली आहे की, क्रिमिनल गाणं हे ‘छमक छल्लो’ पेक्षा हिट होईल. म्हणून मी शाहरुखला ५ हजार रुपये देईन, आणि जर तो हरला तर तो मला ५ कोटी रुपये देईल.’

या चित्रपटाच्या गाण्यांसाठी पहिल्यांदाच एकॉनला भारतात येण्याची संधी मिळाली होती, जिथे प्रत्येकाला हे गाणे खूप आवडले. हा चित्रपट कदाचित प्रेक्षकांना फारसा आवडला नसेल, पण २०११ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट सर्वात महागड्या चित्रपटांपैकी एक होता.

शाहरुख खानच्या नव्या चित्रपटांबद्दल बोलायचं झाले, तर अभिनेत्याने अलीकडेच आपल्या ‘पठाण’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत दिसणार आहे. शाहरुख खानने दुबईला जाऊन या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. या चित्रपटामध्ये शाहरुख खानसोबत, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत असणार आहेत. कोरोनामुळे चित्रीकरण मुंबईत बंद आहे, त्यातच नुकतीच बातमी हाती आली आहे की, दीपिका पदुकोणला कोरोनाची लागण झाली आहे. लॉकडाऊन झाल्यावर, दीपिका आपल्या घरी गेली होती, तिच्या वडिलांनाही कोरोनामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-पँटलेस हुडी घालून जिममध्ये पोहोचली ‘नॅशनल क्रश’ रश्मिका मंदाना; कॅमेऱ्यात कैद झाले तिचे क्यूट एक्सप्रेशन्स

-‘दिलबर गर्ल’ नोरा फतेहीने शेअर केले नवीन फोटो, पाहून तुम्हीही म्हणाल, ‘अगं पडशील ना!’

-कमालच म्हणायची! वयाच्या ४४ व्या वर्षीही अभिनेत्री दिसते खूपच आकर्षक, सोशल मीडियावरील फोटोंनी लावली आग


Leave A Reply

Your email address will not be published.