भयंकर! प्रियांका चोप्राच्या नवऱ्याचा मोठा अपघात, व्हिडीओ होतोय व्हायरल


प्रियांका चोप्रा याचा पती आणि अमेरिकन गायक व अभिनेता निक जोनास जखमी झाला होता. मेमध्ये निकचा अपघात झाला होता. त्यावेळी तो एनबीसी स्पेशल ऑलिम्पिक ड्रीम्स फिचरींग द जोनस ब्रदर्सची शूटिंग करत होता. हा प्री-टेप कार्यक्रम नुकताच टेलीकास्ट करण्यात आला होता, ज्यात निक त्याचा मोठा भाऊ जोय जोनास आणि केविन जोनास यांच्याबरोबर स्पर्धा करताना दिसला. या सिरीजमध्ये ट्रॅक आणि फील्ड, जिम्नॅस्टिक आणि बीएमएक्स बाइक चालविणे यासारख्या अनेक ऑलिम्पिक खेळांचा समावेश आहे.

त्याचा हा व्हिडिओ नुकताच एनबीसीच्या ऑलिम्पिक ड्रीममध्ये दाखवला गेला. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, बाइक चालवताना वळत असताना निक जोनास पडतो. त्याचे भाऊही त्याला धडकतात. यानंतर निक जोनासला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले. त्याच्या एका चाहत्याने सोशल मीडियावर ही क्लिप शेअर केली आहे. त्याने लिहिले की, ‘ऑलिम्पिक ड्रीम्सच्या वेळी निक जोनास बाइकवरून खाली पडला आणि त्याच्या पाठीची हड्डी तुटली. (nick jonas ribs breaking bike crash video is finally released)

मे महिन्यातच निकने तब्येतीची माहिती देताना सांगितले होते, की तो बरा आहे. नुकतेच निक जोनास आणि प्रियांका चोप्राने त्यांच्या लग्नाचा तिसरा वाढदिवस साजरा केला. त्यांनी इंस्टाग्रामवर अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केलेले पाहायला मिळाले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

खरंच की काय! रिया चक्रवर्तीला बॉलिवूड नाही, तर हॉलिवूडमधून मिळणार चित्रपटांमध्ये झळकण्याची संधी?

-सुहानाने स्विमिंग पूल जवळील हॉट फोटो केले शेअर; आई गौरीने केले क्लीक, तर शाहरुख म्हणतोय, ‘हा दिखावा आहे…’

मीरा राजपूतने केली ओठांची सर्जरी? व्हि़डिओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण


Leave A Reply

Your email address will not be published.