नाकात बाळी अन् निळ्या रंगाचे केस असणाऱ्या व्यक्तीसोबत नोराने लावले ठुमके; नेटकरी म्हणाले, आहे तरी कोण?


बॉलिवूडमधील अत्यंत बोल्ड, हॉट अभिनेत्री आणि डान्सर म्हणजे नोरा फतेही. ती अभिनयासोबत सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रिय असते. तिचे डान्स व्हिडिओ ती नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते. आता देखील तिने तिचा एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. जो बघताना तुम्हाला दुप्पट आनंद होईल.

या व्हिडिओमध्ये नोरा नाकात बाळी आणि निळे केस असणाऱ्या एका व्यक्तीसोबत डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. तिचे चाहते आता तिला हा प्रश्न विचारत आहेत की, हा व्यक्ती आहे तरी कोण?? (Nora fatehi dance video viral where she dance in funny way with her partner)

नोरा फतेहीने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती हिपहॉप डान्स स्टाईल करताना दिसत आहे. यामध्ये तिच्यासोबत आणखी एक व्यक्ती तिच्याप्रमाणे मजेशीर डान्स करताना दिसत आहे. डान्स सोबतच या व्यक्तीचा लूक देखील सगळ्यांचे लक्ष वेधत आहे. त्याने शॉर्ट्स, टी-शर्ट, निळ्या रंगाचे केस आणि नाकात बाळी घातलेली दिसत आहे.

तिच्या चाहत्यांना तिचा हा डान्स व्हिडिओ खूप आवडला आहे. सगळे यावर प्रतिक्रिया देत आहेत. खरंतर ही काही पहिली वेळ नाहीये, जेव्हा तिने तिचा डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. परंतु तिचा हा व्हिडिओ प्रेक्षकांच्या खास पसंतीस पडला आहे. तसेच सगळे तिला व्हिडिओमध्ये तिच्यासोबत डान्स करणारा व्यक्ती कोण आहे?, हे विचारत आहेत. याआधी देखील तिने अनेक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

नोरा एक उत्कृष्ट डान्सर आहे. तिच्या ‘दिलबर’ या गाण्याने तर सगळ्या गाण्यांचे रेकॉर्ड तोडून टाकले होते. नंतर ती ‘स्ट्रीट डान्सर 3’ मध्ये देखील दिसली होती.

तिने ‘ओ साकी साकी’, ‘कमरीया’, ‘एक तो कम जिंदगानी’ या सुपरहिट गाण्यांवर डान्स केला आहे. ती लवकरच ‘सत्यमेव जयते 2’ या चित्रपटात दिसणार आहे. तसेच ती अजय देवगण आणि सोनाक्षी सिन्हा सोबत ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटात देखील दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-डब्बू अंकल यांचा नवीन डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, पुन्हा एकदा जिंकले प्रेक्षकांचे मन

-ओठांच्या सर्जरीमुळे बदलला सलमान खानच्या अभिनेत्रीचा लूक; ‘चेहरा बर्बाद केलास’, म्हणत नेटकऱ्यांनी केले ट्रोल

-ब्लु नाईटीमध्ये दिसली रुचिरा जाधव; अभिनेत्रीच्या हॉट अंदाजाने नेटकरी झाले घायाळ


Leave A Reply

Your email address will not be published.