कंबर लचकवत डान्स करताना दिसली नोरा फतेही; व्हिडिओ पाहून पुन्हा एकदा पडाल प्रेमात


बॉलिवूड अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेही हिने अगदी कमी कालावधीत तिची ओळख निर्माण केली आहे. तिच्या डान्स स्टाईलने लाखो चाहते कमावले आहेत. तिचा डान्स बघताना कोणीही तिच्यावरून नजर हटवू शकत नाही. अशातच तिचा एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तिचा डान्स पाहून तिच्या आजूबाजूचे लोक देखील डान्स करायला लागले आहेत.

तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तिची कंबर हलवण्याची स्टाईल पाहून सगळेच प्रभावित होतात. नोराची कोणतीही स्टाईल तिच्या चाहत्यांना खूप आवडते. तिची फॅशन सेन्स असो किंवा कोणता डान्स असो, चाहते नेहमीच तिच्या प्रत्येक गोष्टीला भरभरून प्रतिसाद देत असतात. तिचा हा डान्स पाहून तुम्ही नक्कीच पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडण्यापासून स्वतः ला थांबवू शकणार नाही. डान्समधील तिचे ठुमके आणि इशारे सगळ्यांना खूप आवडले आहेत. (Nora fatehi sensuous dance moves goes viral, fans get crazy to see video)

या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, नोरा मेकअप रूममध्ये उभी आहे. आरशात पाहून ती तिच्या फोनमध्ये रेकॉर्डिंग चालू करते आणि तिची कंबर हलवायला सुरुवात करते. तिच्यासोबत आणखी दोन लोक असतात. तिचा डान्स पाहून ते दोघे देखील हरवून जातात आणि तिच्यासोबत डान्स करायला सुरुवात करतात. नोराचा डान्स पाहून तिचे चाहते तिचे खूप कौतुक करत आहे. तिच्या या व्हिडिओवर अनेकांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत.

नोरा ही एक उत्कृष्ट डान्सर तसेच अभिनेत्री आहे. तिने अनेक गाण्यांमध्ये डान्स केला आहे. तिच्या ‘दिलबर’ या गाण्याने तर सगळ्या गाण्यांचे रेकॉर्ड तोडून टाकले होते. नंतर ती ‘स्ट्रीट डान्सर ३’ मध्ये देखील दिसली होती. तिने ‘ओ साकी साकी’, ‘कमरीया’, ‘एक तो कम जिंदगानी’ या सुपरहिट गाण्यांवर डान्स केला आहे. तसेच तिचे ‘हाय गर्मी’ हे गाणे लोकप्रिय झाले आहे. ती लवकरच ‘सत्यमेव जयते २’ या चित्रपटात दिसणार आहे. ती अजय देवगण आणि सोनाक्षी सिन्हासोबत ‘भुज : द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटात देखील दिसली आहे. नुकतेच तिचे ‘कुसु कुसू’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Latest Post

error: Content is protected !!