Wednesday, May 14, 2025
Home बॉलीवूड ‘हे लोक निर्लज्ज आहेत…’ चित्रपट बनवण्याच्या शर्यतीत असणाऱ्या निर्मात्यांवर खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केली टीका

‘हे लोक निर्लज्ज आहेत…’ चित्रपट बनवण्याच्या शर्यतीत असणाऱ्या निर्मात्यांवर खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केली टीका

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी, भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत POK आणि पाकिस्तानमध्ये प्रवेश केला आणि अनेक दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. यानंतर देशभरात देशभक्तीची लाट पसरली आहे. या सगळ्यात, ‘ऑपरेशन सिंदूर’वर चित्रपट बनवण्यासाठी बॉलिवूडमध्ये गर्दी सुरू आहे. भावनिक उत्साहाचा फायदा घेण्यासाठी चित्रपट निर्माते त्याच्याशी संबंधित शीर्षक मिळविण्यासाठी शर्यतीत आहेत. त्याचवेळी, शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

‘ऑपरेशन सिंदूर’च्या नावाखाली चित्रपट बनवून पैसे कमविण्यासाठी निर्मात्यांची झुंबड उडाली आहे. अनेक प्रॉडक्शन हाऊसेसनी टायटल रजिस्टर करण्यासाठी अर्ज पाठवले आहेत. यामध्ये जॉन अब्राहमच्या प्रॉडक्शन हाऊस तसेच आदित्य धरच्या प्रॉडक्शन हाऊसची नावे समाविष्ट आहेत. दरम्यान, यावर शिवसेना (उद्धव ठाकरे गट) राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी संतापल्या आहेत. त्यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवर यासंबंधीच्या एका मीडिया रिपोर्टचा स्क्रीनशॉट शेअर केला आणि त्यावर टीका करताना लिहिले, “बेशरम गिधाडे.”

माध्यमातील वृत्तानुसार, ऑपरेशन सिंदूर आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी संबंधित शीर्षक मिळविण्यासाठी अनेक मोठ्या निर्मिती संस्थांकडून इंडियन मोशन पिक्चर प्रोड्यूसर्स असोसिएशन (IMPPA) आणि इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन प्रोड्यूसर्स कौन्सिल (IFTPC) कडे मोठ्या संख्येने अर्ज पाठवले जात आहेत. अहवालानुसार, आयएफटीपीसीचे सुरेश अमीन यांच्या मते, बुधवारी दुपारी ३ वाजल्यापासून संस्थेला निर्मात्यांकडून टायटल नोंदणीसाठी अर्ज मिळण्यास सुरुवात झाली.

पुढे असे म्हटले आहे की, सुरेश म्हणाले, “ऑपरेशन सिंदूरचे शीर्षक मिळविण्यासाठी निर्मात्यांकडून आयएफटीपीसीकडे अर्जांची गर्दी झाली आहे. आम्हाला मिळालेले सर्व शीर्षके मिशनवर आधारित आहेत. आम्हाला या शीर्षकासाठी सुमारे १०-१२ अर्ज मिळाले आहेत, जे सर्व ऑपरेशनशी संबंधित आहेत.” ते पुढे म्हणाले, “बॉलिवूडमधील मोठ्या प्रॉडक्शन हाऊसकडून अर्ज आले आहेत. चित्रपटांव्यतिरिक्त, वेब सिरीजसाठी देखील अर्ज येत असल्याचे त्यांनी सांगितले.”

पुढे असे लिहिले आहे की उद्योगातील अनेक मोठ्या नावांनी त्यांचे अर्ज पाठवले आहेत. यामध्ये जॉन अब्राहमचे प्रोडक्शन बॅनर, आदित्य धरचे प्रोडक्शन हाऊस, महावीर जैन यांची कंपनी, अशोक पंडित, चित्रपट निर्माते मधुर भांडारकर आदी नावांचा समावेश आहे. झी स्टुडिओज, रिलायन्स, जेपी फिल्म्स, बॉम्बे शो स्टुडिओज आणि ऑलमाईटी मोशन पिक्चर सारखे स्टुडिओज देखील या शर्यतीत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा  

कंगनाला मिळाला हॉलीवूड सिनेमा; मुख्य भूमिकेत दिसणार अभिनेत्री, पदार्पणासाठी सज्ज…
पीच रंगाच्या ड्रेसमध्ये जान्हवी कपूरचा हॉट लुक; एकदा फोटो पाहाच

हे देखील वाचा