जाणून घ्या ९४ व्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये बाजी मारलेल्या सर्व विजेत्यांची यादी

सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणाऱ्या ९४ व्या ऑस्कर पुरस्कारांचा सोहळा नुकताच संपन्न झाला. मनोरंजनविश्वातील सर्वात मानाच्या आणि मोठ्या समजल्या या पुरस्कारांची सर्वानी तब्ब्ल दोन वर्ष वाट पाहिली. करोना काळानंतर २ वर्षांनी लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ऑस्कर सोहळ्याच्या परंपरेला साजेशा असा हा दिमाखदार सोहळा पार पडला. या शानदार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एमी शूमर, रेजिना हॉल आणि वांडा सायकस यांनी केले. ‘द पॉवर ऑफ द डॉग’ या चित्रपटाला यावर्षी सर्वाधिक १२ नामांकने ‘ड्युन’ला १०, ‘बेलफास्ट’ आणि ‘वेस्ट साईड स्टोरी’ला ७ नामांकने मिळाली होती.

विल स्मिथच्या किंग रिचर्ड या चित्रपटाला सहा नामांकने मिळाली होती. या पुरस्कार सोहळ्यामध्ये कोडा हा सर्वोत्कृष्ट सिनेमाचा सन्मान मिळवला. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री जेसिका चेस्टेन हिला द आईज ऑफ टॅमी फाये या सिनेमासाठी मिळाला. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार विल स्मिथ याला किंग रिचर्ड सिनेमासाठी देण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यातील संपूर्ण विजेत्यांची नावे जाणून घेऊया.

सर्वोत्कृष्ट चित्रपट- कोडा (CODA)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- जेसिका चेस्टेन, द आईज ऑफ टॅमी फाये (The Eyes of Tammy Faye)

सर्वोत्कृष्ट अभिनेता- विल स्मिथ, किंग रिचर्ड (King Richard)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- जेन कॅम्पियन, द पॉवर ऑफ द डॉग (The Power of the Dog)

सर्वोत्कृष्ट ओरिजिनल गाणं- नो टाइम टू डाय, नो टाइम टू डाय (No Time to Die) बिली एलिश आणि फिनिज ओकॉनेल यांनी दिलं संगीत

सर्वोत्कृष्ट माहितीपट फिचर- समर ऑफ सोल Summer of Soul (…Or, When the Revolution could not be televised)

सर्वोत्कृष्ट अडाप्टेड स्क्रिनप्ले- शियान हेडर (CODA)

सर्वोत्कृष्ट ओरिजिनल स्क्रिनप्ले- केनेथ ब्रनाघ लिखित बेलफास्ट (Belfast)

सर्वोत्कृष्ट कॉश्च्युम डिझाइन- जेनी बीवन (क्रुएला)

सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फिचर- ड्राइव्ह माय कार (जपान)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- अॅरिएना डीबोस, वेस्ट साइड स्टोरी (West Side Story)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- ट्रॉय कोत्सुर (CODA)

सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड फिचर- एन्कँटो (Encanto)

सर्वोत्कृष्ट ओरिजिनल स्कोअर- हान्स झिमर, ड्युन (Dune)

सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी- ग्रेग फ्रेजर, ड्युन (Dune)

सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स- ड्युन, पॉल लॅम्बर्ट, त्रिस्टान माइल्स, ब्रियान कॉनर, गर्ड नेफ्झर (Dune)

सर्वोत्कृष्ट फिल्म एडिटिंग- जो वॉकर, ड्युन (Dune)

सर्वोत्कृष्ट साऊंड- मॅक रुथ, मार्क मांगिनी, थिओ ग्रीन, डग हेम्फिल, रॉन बार्लेट (Dune)

सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाइन- पॅट्रिस वर्मिट, शुशाना सिपॉस (Dune)

सर्वोत्कृष्ट मेकअप आणि हेअरस्टायलिंग- द आइज ऑफ टॅमी फाये, लिंडा डॉड्स, स्टेफनी इन्ग्राम, जस्टीन राले (The Eyes of Tammy Faye)

सर्वोत्कृष्ट लाइव्ह अॅक्शन शॉर्ट- द लाँग गुडबाय (The Long Goodbye)

सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड शॉर्ट- द विंडशिल्ड पायपर (The Windshield Piper)

सर्वोत्कृष्ट माहितीपट शॉर्ट- द क्वीन ऑफ बास्केटबॉल (The Queen of Basketball)

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा – 

Latest Post