Friday, March 29, 2024

अभिनयाशिवाय पंकज त्रिपाठी ‘या’ कलेतही आहे पारंगत, ‘कालीन भैया’चा हा अंदाज घेतोय सर्वांचे लक्ष वेधून

बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठी आपल्या दमदार अभिनयासाठी हिंदी चित्रपट जगतात प्रसिद्ध आहेत. अनेक आव्हानात्मक भूमिका त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीत लीलया पेलल्या. पंकज त्रिपाठी यांची अभिनय कला तर सर्वांनाच ठाऊक आहे परंतु अलीकडेच पंकज त्रिपाठी यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये ते ढोलकी वाजवताना दिसत आहेत. पंकज त्रिपाठीच्या या नव्या कलेच चाहत्यांनी भरभरुन कौतुक केले आहे.

पंकज त्रिपाठी हे हिंदी चित्रपट जगतातील दिग्गज आणि प्रभावी अभिनेते म्हणून प्रसिद्ध आहेत. आपल्या कसदार अभिनयाने ते नेहमीच चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत असतात. ‘मिर्झापूर’ मधील त्यांच्या कालीन भैय्याच्या भूमिकेचे खुप कौतुक झाले. या भूमिकेमुळेच त्यांना नवीन ओळख मिळाली. पंकज त्रिपाठी यांनी त्यांच्या भूमिका इतक्या जिवंत पडद्यावर साकारल्या की, कधी कधी मुख्य नायकावर देखील ते भारी पडले. परंतु पंकज त्रिपाठी यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामुळे तर खूपच चर्चेत आले आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये ते ढोलकी वाजवताना दिसून येत आहेत. त्यांच्या या नव्या कलेच्या दर्शनाने चाहते मंत्रमुग्ध झाले आहेत. नुकताच पंकज त्रिपाठी यांच्या घरी संगीत संध्या कार्यक्रम आयोजित केला होता. ज्यामध्ये खुद्द पंकज त्रिपाठी यांनी ढोलकी वादन केले.

हा व्हायरल व्हिडिओ या संगीत कार्यक्रमाचे लेखक शशी भूषण यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओची सुरुवातीला शशी भूषण हातात गिटार घेऊन ‘जिवन रास ना आये’ हे शास्त्रीय संगीत गाताना दिसत आहेत. या सोबतच ढोलकीची मधुर थाप ऐकू येत आहे जी खुद्द पंकज त्रिपाठी मारताना दिसत आहे. पंकज त्रिपाठी जमिनीवर बसून ढोलकी वाजवत आहेत तर शेजारी त्यांच्या पत्नी सोफ्यावर बसलेल्या दिसून येत आहेत.

या व्हिडिओला शेअर करत शशी भूषण लिहतात की ‘कालीन भैय्या आणि मी, आज मला कालीन भैय्याच्या घरी जाण्याचा योग आला. किती छान व्यक्ती आहेत कालीन भैय्या! इतके सुंदर की दुसर्‍याच भेटीत त्यांना पंकज भैय्या म्हणेपर्यंत माझं धाडस झाले. मी त्यांना पंकज सर ऐवजी पंकज भैय्याच म्हणतो. मी अविनाश भैय्यांचा आभारी आहे ज्यांच्यामुळे माझी सगळी स्वप्नं जणू ताटात वाढल्यासारखी वाटत आहे. मी आयुष्यभर तुमच्या सोबत आहे अविनाश भैय्या ” असेही ते म्हणाले. त्यांच्या या पोस्टवरून त्यांना झालेला आनंद स्पष्ट व्यक्त होताना दिसत आहे.

दरम्यान पंकज त्रिपाठी यांनी केलेल्या अनेक दर्जेदार भूमिका तुफान गाजल्या. त्यांची कालीन भैय्याची भूमिका तर प्रचंड लोकप्रिय झाली होती. याव्यतिरिक्त त्यांनी ‘गुंजन सक्सेना’, ‘लुडो’, ‘मिमी’ मध्ये सुद्धा काम केले असून, पंकज त्रिपाठी लवकरच रणवीर सिंगसोबत ’83’ या चित्रपटात झळकणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-खुश खबर! नागा चैतन्यसोबत घटस्फोटानंतर, दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर समंथाने दिली आनंदाची बातमी

-आर्यन खानने जेलमध्ये एनसीबी संचालक समीर वानखेडेंना दिले ‘हे’ वचन; ऐकून शाहरुखलाही वाटेल अभिमान

-नागा चैतन्यपासून घटस्फोट घेतल्यानंतर समंथाचे करिअरवर लक्ष; हिंदी चित्रपटाव्यतिरिक्त साईन केले अनेक प्रोजेक्ट्स

हे देखील वाचा