पहिल्या भेटीनंतर परिणीतीने गूगलवर चेक केली राघव चड्डाची माहिती, पुढे ‘अशी’ झाली लव्हस्टोरीला सुरुवात

परिणीती चोप्राने (Pareeniti)नुकतेच गाण्याच्या मंचावर पदार्पण केले आहे. या अभिनेत्रीने मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये आपला पहिला लाईव्ह परफॉर्मन्स दिला आणि यादरम्यान गायनात करिअर करण्याविषयी बोलताना अभिनेत्रीने सर्व श्रेय राघव चढ्ढा यांना दिले. आता परिणीतीने राघव चढ्ढासोबतच्या तिच्या पहिल्या भेटीबद्दल आणि प्रेमकथेबद्दल सांगितले आहे.

परिणीती चोप्राने आयसीसी यंग लीडर्स फोरममध्ये बोलताना खुलासा केला की राघव चढ्ढा यांना पहिल्यांदा भेटल्यानंतरच तिने Google वर आप नेत्याची वैवाहिक स्थिती तपासली होती. ती म्हणाली की, “मला आठवतं, प्रजासत्ताक दिनी आम्ही सकाळी नाश्त्यासाठी भेटलो होतो. मी कदाचित अर्धा तास त्याच्याबरोबर बसले आणि मला हे मिळाले आणि मला असे वाटले की हा तो माणूस आहे ज्याच्याशी मी लग्न करणार आहे.”

परिणीती पुढे म्हणाली, “मला त्याच्याबद्दल काहीच माहिती नव्हती. त्याचे वय किती आहे हे मला माहित नव्हते, त्याचे लग्न झाले आहे की नाही हे मला माहित नव्हते, कारण मी कधीही राजकारण पाहिले नाही. म्हणूनच मला त्याच्याबद्दलच्या वैयक्तिक गोष्टी माहित नव्हत्या. जेव्हा मी माझ्या हॉटेलच्या खोलीत परत गेले, तेव्हा मी त्याला गुगलवर शोधू लागले की ‘राघव चड्ढाचे वय, राघव चड्डा विवाहित आहे का?”

अभिनेत्री राघव चड्ढाबद्दल पुढे म्हणते, “माझ्या मनात असे वाटत होते की हा तो मुलगा आहे, हाच तो माणूस आहे ज्याची मी वाट पाहत होते. सुदैवाने तो अविवाहित होता आणि सुदैवाने सर्व काही योग्य घडले.”

परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा पहिल्यांदा लंडनमध्ये एका पुरस्कार सोहळ्यादरम्यान भेटले होते. यानंतर दोघांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये लग्न केले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

कर्करोग जनजागृती दिन: फक्त सुशांतसिंग नव्हे, कॅन्सरशी लढणाऱ्या पडद्यावरील ‘या’ भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात
पैसे वाचवण्यासाठी रुपाली गांगुली चालायची तब्बल 15 किमी, सांगीतला संपूर्ण अनुभव