अय्या खरंच! टायगर श्रॉफची गर्लफ्रेंड दिशा पटानी आणि टीव्ही कलाकार पार्थ समथान होते एकमेकांच्या प्रेमात?

Parth Samthaan and disha patani were in relationship


‘कसोटी जिंदगी की’ या टीव्ही मालिकेमधून घराघरात पोहचलेला अभिनेता पार्थ समथानने नुकताच त्याचा 30 वा वादढदिवस साजरा केेला. त्याचा जन्म 11 मार्च 1991 मध्ये मुंबई येथे झाला होता. ‘कसोटी जिंदगी की’ या मालिकेत त्याच्या अनुराग बासू या पात्राला खूपच ओळख मिळाली. तिथूनच खरी त्याच्या करीअरला सुरूवात झाले. त्याचे नाव बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रीसोबत जोडले गेले होते. तसं पाहायला गेलं, तर पार्थ त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कधीच खुलासा करत नाही. चला तर आज त्याच्या वाददिवसानिमित्त त्याच्या अफेअर्सबद्दल जाणून घेऊया…

पार्थची फॅन फॉलोविंग खूप आहे. सोशल मीडियावर तो मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. त्याचे नाव बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींसोबत जोडले आहे. त्याचे नाव त्याची को- स्टार ‘एरिका फर्नांडिस’ हिच्यासोबत जोडले होते. शोच्या दरम्यान त्यांच्या अफेअर्सबद्दल जोरदार चर्चा चालू होती. परंतु त्या दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल कधीही सगळ्यांसमोर खुलासा नाही केला.

या व्यतिरिक्त पार्थचे नाव बॉलिवूडमधील अभिनेता टायगर श्रॉफ याची गर्लफ्रेंड दिशा पटानी हिच्यासोबत देखील जोडले गेले होते. ते दोघेही जवळपास 1 वर्ष रिलेशनमध्ये होते. परंतु त्यानंतर त्या दोघांमध्ये कोणीतरी तिसरा आला आणि त्यांचा ब्रेकअप झाला. पार्थ त्यावेळी टीव्ही निर्माता विकास गुप्ता सोबत देखील रिलेशन होता. विशेष म्हणजे विकास हा उभयलिंगी( बाय सेक्शुअल) असल्याची माहिती त्यांनी स्वत: माध्यमांना दिली होती.

काही दिवसांपूर्वी पार्थ कोरोना विषाणूच्या विळख्यात अडकला होता. याची माहिती त्याने त्याच्या चाहत्यांना देखील दिली होती की, तो आता पूर्णपणे ठीक झाला आहे. त्याने या गोष्टीचा देखील खुलासा केला आहे की, कोरोनाची टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्याला एक पॅनिक अटॅक आला होता.

पार्थच्या करिअरबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने टीव्ही मालिकेमध्ये ‘प्यार तुने क्या किया’, ‘कसोटी जिंदगी की’, ‘ये हे आशिकी’ यामध्ये काम केले आहे. याव्यतिरिक्त त्याने वेबशो ‘कैसी है यारीया 3’ , ‘कहने को तो हम सफर हैं 2’ यात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सनी देओलच्या ‘त्या’ एका चुकीमुळे वडील धर्मेंद्र यांना बसला होता कोट्यवधींचा फटका! वाचा तो किस्सा

-बॉक्स ऑफिसवर पहिल्यांदा ३०० कोटींचा चित्रपट देणारा ‘मिस्टर पर्फेक्शनिस्ट!’ पाण्याची समस्या सोडवण्यासाठी उभारले ‘पानी फाउंडेशन’

-भारतीय माजी क्रिकेटर रवी शास्त्रींसोबत अफेयरच्या चर्चा, नऊ वर्षांच्या करियरमध्ये तीस सिनेमांना नकार, तरीही अभिनेत्रीने घातली यशाला गवसणी


Leave A Reply

Your email address will not be published.